New Zealand vs South Africa, 2nd Test : न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातली दुसरी कसोटी रंगतदार अवस्थेत आहे. यजमान न्यूझीलंडने पहिली कसोटी सहज जिंकल्यानंतर आफ्रिकेकडून दमदार प्रत्युत्तर मिळालेले दिसतेय. पहिल्या डावात ३६४ धावा करणाऱ्या आफ्रिकेने यजमानांचा पहिला डाव २९३ धावांवर गुंडाळला. त्यानंतर दुसरा डाव ९ बाद ३५४ धावांवर घोषित करून न्यूझीलंडसमोर ४२६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पण, चौथ्या दिवसअखेर किवींनी ४ फलंदाज ९४ धावांवर गमावले आहेत आणि अखेरच्या दिवशी त्यांना ३३२ धावा करायच्या आहेत. मात्र, हा सामना चर्चेत आलाय तो न्यूझीलंडच्या विल यंग ( Will Young) याने टिपलेल्या अविश्वसनीय कॅचमुळे.
आफ्रिकेकडून पहिल्या डावात सॅरेल एर्वीने १०८ धावांची खेळी केली. त्याला कर्णधार डीन एल्गर ( ४१), एडन मार्कराम ( ४२), रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन ( ३५), मार्को येनसेन ( ३७), केशव महाराज ( ३६) व टेम्बा बवुमा ( २९) यांची साथ मिळाली. किवींच्या निल वॅगनरने चार, तर मॅट हेन्रीने ३ विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडसाठी पहिल्या डावात कॉलिन डी ग्रँडहोम धावून आला. त्याच्या १२० धावांच्या जोरावर किवींनी तीनशे धावांच्या समीप पल्ला गाठला. डॅरील मिचेल ( ६०) व हेन्री निकोल्स ( ३९) यांची त्याला साथ मिळाली. कागिसो रबाडाने पाच, तर मार्को येनसेनने चार विकेट्स घेतल्या.
दुसऱ्या डावात कायले व्हेरेयन्नेने १३६ धावांची खेळी केली. कागिसो रबाडा ( ४७) व ड्यूसेन ( ४५) यांनीही चांगला खेळ केला. या डावात मार्को येनसेनचा ( ९) सुरेख झेल विल यंगने टिपला. ग्रँडहोमच्या गोलंदाजीवर येनसेनने टोलावलेला चेंडू सहज सीमापार जाईल असे वाटत होते. पण, विल हवेत झेपावला अन् एका हाताने चेंडू टिपला. Will Young with one of the greatest catches ever in Test cricket!!! Watch
पाहा व्हिडीओ..