न्यूझीलंडचा ८८ चेंडू राखून विजय! वर्ल्ड कपमधून बाहेर पडले; पण अखेर विजयाचे खाते उघडले

न्यूझीलंडच्या संघाला अखेर विजयाचे खाते उघडण्यात यश आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 08:51 AM2024-06-15T08:51:38+5:302024-06-15T08:52:15+5:30

whatsapp join usJoin us
  NZ vs UGA T20 World Cup 2024 New Zealand beat Uganda by 9 wickets and 88 balls | न्यूझीलंडचा ८८ चेंडू राखून विजय! वर्ल्ड कपमधून बाहेर पडले; पण अखेर विजयाचे खाते उघडले

न्यूझीलंडचा ८८ चेंडू राखून विजय! वर्ल्ड कपमधून बाहेर पडले; पण अखेर विजयाचे खाते उघडले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

NZ vs UGA T20 World Cup 2024 : ट्वेंटी-२० विश्वचषकात संघर्ष करत असलेल्या न्यूझीलंडच्या संघाला अखेर विजयाचे खाते उघडण्यात यश आले. नवख्या युगांडाविरूद्ध मोठा विजय मिळवून किवी संघाने दोन गुण मिळवले. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या ३२ व्या सामन्यात न्यूझीलंड आणि युगांडा हे संघ भिडले. यांच्या क गटातून वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तानने सुपर-८ मध्ये जागा मिळवली आहे. त्यामुळे हा सामना म्हणजे केवळ औपचारिकता होती. त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात किवी संघाच्या गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला. युगांडाला अवघ्या ४० धावांत गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडने ५.२ षटकांत १ बाद ४१ धावा करून विजय साकारला.

युगांडाने दिलेल्या ४१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने सहज विजय मिळवला. फिन लनने (९) आणि डेव्होन कॉन्वेने नाबाद (२२) धावा केल्या, तर रचिन रवींद्र एक धाव करून नाबाद परतला. त्यात ९ अतिरिक्त धावांमुळे किवी संघाचा विजय आणखीच सोपा झाला.

तत्पुर्वी, युगांडाचा संपूर्ण संघ १८.४ षटकांत अवघ्या ४० धावांवर सर्वबाद झाला. युगांडाकडून एकाही फलंदाजाला ११ हून अधिक धावा करता आल्या नाहीत. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सांघिक कामगिरी करताना प्रतिस्पर्धी संघाला अर्धशतकी धावसंख्या देखील करून दिली नाही. किवी संघाकडून टीम साऊदीने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर ट्रेन्ट बोल्ट (२), मिचेल सँटनर (२), रचिन रवींद्र (२) आणि लॉकी फर्ग्युसनने (१) बळी घेतला. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मधून अधिकृतपणे बाहेर झालेल्या न्यूझीलंडच्या संघाच्या खात्यात भोपळा होता. त्यामुळे युगांडाला नमवून न्यूझीलंडने विजयाते खाते उघडले. न्यूझीलंडला आपल्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. 

न्यूझीलंडचा संघ -
केन विल्यमसन (कर्णधार), डेव्होन कॉन्वे, फिन लन, रचिन रवींद्र, डेरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टीम साऊदी, ट्रेन्ट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन.

युगांडाचा संघ - 
ब्रायन मसाबा (कर्णधार), रोनक पटेल, सायमन सेसाजी, रॉबिन्सन ओबुया, रियाजत अली शाह, अल्पेश रामजानी, दिनेश नाकरानी, कॅनेथ वॅसवा, फ्रेड अचेलम, जुमा मियागी, कॉसमास क्युवता.

Web Title:   NZ vs UGA T20 World Cup 2024 New Zealand beat Uganda by 9 wickets and 88 balls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.