New Zealand vs West Indies, 1st T20I : सिडनीत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची आतषबाजी सुरू असताना ऑकलंडमध्ये किरॉन पोलार्डचं ( Kieron Pollard) वादळ घोंगावलं. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरला. आंद्रे फ्लेचर आणि ब्रँडन किंग यांनी विंडीजला दमदार सुरुवात करून देताना पहिल्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर एका धावेच्या अंतरात विंडीजचा निम्मा संघ माघारी परतला. त्यात पावसाच्या व्यत्ययामुळे सामना १६-१६ षटकांचा करण्यात आला. पण, पावसानंतर ऑकलंडमध्ये पोलार्डचं वादळ आलं अन्...
न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजीला बोलावलं. फ्लेचरनं १४ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांच्या मदतीनं ३४ धावा चोपल्या. किंग १३ धावांवर माघारी परतला. लॉकी फर्ग्युसननं ( Lockie Ferguson) किवींना पहिले यश मिळवून दिले. चौथ्या षटकात फर्ग्युसननं दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर टीम साऊदीनं धक्के दिले. बिनबाद ५८ धावांवर असेला विंडीजचा डाव ५ बाद ५९ असा गडगडला. पण, कर्णधार पोलार्ड आणि फॅबिएन अॅलन यांनी विंडीजचा डाव सावरला. अॅलननं २६ चेंडूंत ३० धावा केल्या. पोलार्डनं ३७ चेंडूंत ४ चौकार व ८ षटकारासह नाबाद ७५ धावा कुटून विंडीजला १६ षटकांत ७ बाद १८० धावांपर्यंत मजल मारून दिली. फर्ग्युसननं २१ धावांत ५ विकेट्स घेतल्या.
Web Title: NZ vs WI : 59 for 5 and Captain Kieron Pollard smashed unbeaten 75 runs; West Indies post 180 for 7 from 16 overs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.