भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात रोहित शर्माच्या आतषबाजीनंतर शुक्रवारी न्यूझीलंडमधील नेपीयर येथे आणखी एक वादळी खेळी अनुभवायला मिळाली. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या ट्वेंटी-20 सामन्यात डेवीड मलाननं तुफान फटेकबाजी केली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यातील मलानचे हे पहिलेच शतक ठरले आणि इंग्लंडकडून ट्वेंटी-20 त शतक करणारा मलान हा अॅलेक्स हेल्सनंतर दुसरा फलंदाज ठरला. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने 20 षटकांत 3 बाद 241 धावा चोपल्या. ट्वेंटी-20 क्रिकेटमधील त्यांची ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली.
विक्रमांचा पाऊस- ट्वेंटी-20 क्रिकेटमधील इंग्लंडची सर्वोच्च धावसंख्याः 3 बाद 241- ट्वेंटी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम भागीदारीः 182 धावा मलान आणि मॉर्गन- इंग्लंडकडून ट्वेंटी-20 त सर्वात जलद अर्धशतकः मॉर्गन ( 21 चेंडू)- इंग्लंडकडून ट्वेंटी-20त सर्वात जलद शतकः मलान ( 48 चेंडू)