भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अखेरचा सामनाही चांगलाच रंगतदार झाला. पण हा अखेरचा सामना जिंकण्यातही न्यूझीलंडला अपयश आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या ट्वेन्टी-२० लढतीमध्येही भारताने विजय मिळवला आणि या मालिकेत ५-० असे निर्भेळ यश मिळवले. या विजयानंतर भारतीय संघातील एका खेळाडूने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ चांगलाच वायरल झाला आहे. पण या व्हिडीओमध्ये तिसरा खेळाडू नेमका आहे तरी कोण, हे सांगू शकाल का...
भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने एक Tik Tok व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या Tik Tok व्हिडीओमध्ये सुरुवातीला दोन खेळाडू आहेत. पहिल्या रांगेत युजवेंद्र चहल आणि श्रेयस अय्यर आपल्याला दिसत आहे. पण या Tik Tok व्हिडीओमध्ये तिसरा खेळाडू नेमका आहे तरी कोण, याची जोरदार चर्चा सुरु आहे.
भारताच्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला चांगली सुरुवात करता आली नाही. कारण न्यूझीलंड आपले पहिले तीन फलंदाज फक्त १७ धावांत गमावले. पण त्यानंतर आपला शंभरावा सामना खेळणारा रॉस टेलर आणि टीम साइफर्ट यांनी दमदार फलंदाजी करत संघाचा डाव सावरला.
टेलर आणि साइफर्ट यांनी चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी रचली. नवदीप सैनीने साइफर्टला बाद करत ही जोडी फोडली, त्याने ३० चेंडूंमध्ये पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५० धावांची खेळी साकारली. साइफर्ट बाद झाल्यानंतर टेलरने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत अर्धशतक पूर्ण केले.
कर्णधार रोहित शर्माच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारताला न्यूझीलंडपुढे १६४ धावांचे आव्हान ठेवता आले.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पाचव्या आणि अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यात पाहुण्यांनी नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हंगामी कर्णधार रोहितने यावेळी संघाच्या क्रमवारीत बदल केला. युवा यष्टीरक्षक संजू सॅमसनला सलामीला पाठवण्याचा प्रयोग करण्यात आला. पण संजूला या संधीचा फायदा उठवता आला नाही आणि २ धावा करून तो बाद झाला.
संजू स्वस्तात बाद झाला असला तरी त्यानंतर रोहित आणि लोकेश राहुल यांनी संघाला डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी रचली. पण मोठा फटका मारण्याचा नादात तो बाद झाला. पण राहुल बाद झाला असला तरी रोहितने एका बाजूने जोरदार फटकेबाजी केली. रोहितच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.
न्यूझीलंडच्या खेळाडूने मैदानात येतात लिहिला इतिहास, केला मोठा पराक्रम
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचव्या आणि अखेरचा ट्वेन्टी-२० सामना सुरु झाल्यावर लगेचच एक मोठी गोष्ट पाहायला मिळाली. मैदानात पाय ठेवताच न्यूझीलंडच्या एका खेळाडूने इतिहास रचला आहे. न्यूझीलंडच्या या खेळाडूने पराक्रम केला असून तो देशाचा अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
Web Title: NZvIND: Tik Tok video of Indian team goes viral; The third player is exactly who ...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.