राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची वरची फळी थोडीशी अडखळली. रजत पाटीदार वगळता इतर फलंदाजांना चांगली सुरूवात मिळाली पण त्याची मोठ्या खेळीत रूपांतर करणं त्यांना जमलं नाही. विराट कोहली अवघ्या ७ धावांवर बाद झाला. कर्णधार फाफ डू प्लेसिस २५ धावा काढून माघारी परतला. ग्लेन मॅक्सवेलने दमदार फटकेबाजीला सुरूवात केली होती. पण ओबेड मकॉयने अफलातून झेल घेत त्याला माघारी धाडले.
ग्लेन मॅक्सवेल आणि रजत पाटीदार या जोडीने धावगती वाढवण्याची जबाबदारी घेतली होती. त्यानुसार मॅक्सवेल तुफान फटकेबाजी करत होता. त्याने १२ चेंडूत २ षटकार आणि १ चौकार लगावला होता. पण १३व्या चेंडूवर मात्र त्याचा फटका चुकला. ट्रेंट बोल्टने त्याला अंगावर येणारा एक चेंडू टाकला. त्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करताना फटका चुकला. चेंडू फिल्डरच्या पुढे पडणार असं वाटत असतानाच मकॉयने पुढच्या दिशेला उडी मारून अप्रतिम झेल टिपला. पाहा व्हिडीओ-
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ- विराट कोहली, फाफ डू प्लेसिस, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (डब्ल्यू), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज
राजस्थान रॉयल्स संघ- यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसीध कृष्णा, ओबेड मॅकॉय, युझवेंद्र चहल