जगभरात आज ईदचा सण साजरा केला जात आहे. लॉकडाऊन असल्यामुळे मुस्लीम बांधव घरातच राहून हा सण साजरा करत आहेत आणि सोशल मीडियावरून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण यानेही ईदच्या निमित्तानं इंस्टाग्रामवर शुभेच्छा देणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यानं शेअर केलेल्या व्हिडीओत वडील आणि भाऊ युसूफ पठाणही दिसत आहे. त्यानं यासोबतच देशवासियांना एक सुंदर संदेर दिला आहे.
जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा 55लाखांच्या वर गेला आहे. त्यापैकी 23 लाख रुग्ण बरे झाले आहेत, परंतु जवळपास साडेतीन लाख रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 38, 917 इतकी झाली आहे. त्यापैकी 57,721 रुग्ण बरे झाले आहेत, तर 4 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इरफाननं काही दिवसांपूर्वी मुस्लीम बांधवांना घरीच राहून ईद साजरी करा असं आवाहन केलं होतं. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वांना आपापले सण घरातच राहून साजरे करण्याचं आवाहन सरकारनंही केलं होतं. त्या आवाहनला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
इरफाननं पोस्ट केलेल्या व्हिडीओतून सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्यात आहेत, शिवाय त्यानं आनंद वाटा, असा संदेशही दिला आहे.
पाहा व्हिडीओ...