लंडन, अॅशेस 2019 : अॅशेस मालिकेच्या निर्णयाक कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात इंग्लंडच्या संघाकडून एक अजब योगायोग पाहायला मिळाला. हा योगायोग म्हणजे इंग्लंडच्या संघात सात खेळाडू शेम टू शेम आहेत. हे ऐकून तुम्ही थोडेसे चक्रावला असाल, पण हो खरंच असं घडलंय...
चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. यावेळी फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला भोपळाही फोडता आला नाही. पण त्यानंतर पुन्हा एकदा स्टीव्हन स्मिथ संघासाठी धावून आला. त्यामुळे पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवण्यात आला ते़व्हा ऑस्ट्रेलियाची 26 षटकांमध्ये 2 बाद 98 अशी अवस्था होती.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी आणि त्यांनी आपला संघ जाहीर केला. त्यानंतर इंग्लंडने आपला संघ जाहीर केला. हा संघ जाहीर झाल्यावर अनेकांनी भुवया उंचावल्या. कारण त्यांना एक गोष्ट समजली होती. आणि ती गोष्ट म्हणजे या संघातील तब्बल सात खेळाडूंची नावे 'J' या इंग्रजी अक्षरावरून सुरु होतात. आता तुम्हालाही या गोष्टीचा विश्वास बसत नसेल.
इंग्लंडच्या संघात जो डेनली (Joe Denly), जो रूट (Joe Root), जेसन रॉय (Jason Roy), जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow), जोस बटलर (Jos Buttler), जोफ्रा आर्चर (Jofra Archer), जॅक लीच (Jack Leach), या सात खेळाडूंची नावे 'J' या इंग्रजी अक्षरावरून सुरु होताना दिसतात