दुबई: भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा हे आयसीसी वन डे फलंदाजी क्रमवारीत क्रमश: दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर कायम आहेत. गोलंदाजांच्या यादीत मात्र वेगवान जसप्रीत बुमराह पाचव्या स्थानी घसरला. कोहली आणि रोहित यांचे अनुक्रमे ८५७ आणि ८२५ गुण आहेत. पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम हा फलंदाजांच्या यादीत ८६५ गुणांसह अव्वल स्थानी आहे.
गोलंदाजांमध्ये न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट याने ७३७ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले. बांगला देशचा मेहदी हसन याने कारकिर्दीत पहिल्यांदा दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. टॉप तीनमध्ये दाखल झालेला मेहदी बांगला देशचा तिसरा गोलंदाज बनला. २००९ ला शाकिब आणि २०१० ला अब्दूर रझ्झाक यांनी दुसरे स्थान मिळविले होते. श्रीलंकेविरुद्ध मेहदीने ३० धावात चार आणि २८ धावात तीन गडी बाद केले होते.
Web Title: ODI rankings: Virat Kohli second, Jaspreet Bumrah fifth
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.