दुबई : भारतात यावर्षी होणाऱ्या वनडे विश्वचषकाची ट्रॉफी आयसीसीने चक्क अंतराळातून लॉन्च केली आहे. नरेेंद्र मोदी स्टेडियमवर ही ट्रॉफी उतरविण्याआधी तिला पृथ्वीपासून १ लाख २० फूट उंच सोडण्यात आले होते. यासाठी विशिष्ट स्ट्रेटोस्फेरिक फुग्याचा वापर करण्यात आला होता.
विश्वचषक ट्रॉफीच्या या अनोख्या दौऱ्यावेळी एकूण चार कॅमेऱ्यांच्या साहाय्याने काही नेत्रदीपक फोटोग्राफ काढण्यात आले. २०२३ विश्वचषक सुरू होण्यापूर्वी ट्रॉफीचा हा प्रवास फार मोठा असणार आहे. देशोदेशींच्या विविध शहरांत ही ट्रॉफी चाहत्यांना बघण्यासाठी ठेवण्यात येणार आहे.
आयसीसीने जाहीर केल्यानुसार, आज २७ जूनपासून या ट्रॉफीच्या प्रवासाला भारतातून सुरुवात होईल. ही ट्रॉफी एकूण १८ देशांमधून नेण्यात येणार आहे.
यावर्षी भारतात होणार्या विश्वचषक २०२३ च्या ट्रॉफीचे अनावरण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) ने अतिशय अनोख्या पद्धतीने केले. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे यामध्ये विश्वचषक ट्रॉफी अंतराळात पाठवण्यात आल्याची दिसत आहे.
पहिल्यांदाच क्रीडा ट्रॉफीला अंतराळात पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तिथे त्या ट्रॉफिचे अनावरण करण्यात आले. या वर्षी वर्ल्ड कप २०२३ ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे आणि BCCI त्याचे वेळापत्रक उद्या २७ जून रोजी जाहीर करणार आहे.