ODI World Cup 2023 : मोदी सरकारचा मोठा धक्का! 800 कोटींमुळे BCCI 2023च्या वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद गमावणार?

ODI World Cup 2023 : सामान्य जनताच नव्हे, तर महागाईची झळ आता जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना BCCIच्या दारापर्यंत पोहोचली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 05:22 PM2022-07-19T17:22:39+5:302022-07-19T17:24:06+5:30

whatsapp join usJoin us
ODI World Cup 2023 :  The Finance Ministry has revised taxation on sporting events and a 21% tax will be charged for the 50-over World Cup in 2023, BCCI losing staggering Rs 800 Crore from ICC revenue | ODI World Cup 2023 : मोदी सरकारचा मोठा धक्का! 800 कोटींमुळे BCCI 2023च्या वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद गमावणार?

ODI World Cup 2023 : मोदी सरकारचा मोठा धक्का! 800 कोटींमुळे BCCI 2023च्या वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद गमावणार?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ODI World Cup 2023 : सामान्य जनताच नव्हे, तर महागाईची झळ आता जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना BCCIच्या दारापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे 2023 मध्ये भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद संकटात येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. अर्थमंत्रालयाने क्रीडा स्पर्धांवरील कर वाढवून तो 21 टक्के इतका केला आहे आणि त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी BCCIला 21 टक्के कर भरावा लागणार आहे. हा कर 10 टक्क्यांवरून थेट 21 टक्क्यांवर गेल्याने BCCI ला आता ICCकडून मिळणाऱ्या एकूण महसुलातील 800 कोटींवर पाणी सोडावे लागणार आहे. 

2016 मध्ये भारतात झालेल्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेवर 10 टक्के कर आकारला गेला होता. नोव्हेंबर 2023मध्ये भारतात वर्ल्ड कप होणार आहे. Cricbuzz ने दिलेल्या वृत्तानुसार अर्थ मंत्रांलयाने पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या करात वाढ केल्याचे BCCI ला कळवले  आहे. वर्ल्ड कप 2023मधून एकूण 4000 कोटी महसूल मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यानुसार जवळपास 800 कोटींचा कर बीसीसीआयला सरकारला द्यावा लागणार आहे. सध्याचा नियमानुसार आयसीसीला यजमान देशाकडून कर सवलत मिळणे अपेक्षित आहे. यजमान क्रिकेट बोर्डाने त्यासाठी सरकारची चर्चा करणे गरजेचे आहे.

भारतात ही परिस्थिती प्रथमच उद्भवत नाही. यापूर्वी 2016च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यानही कर सवलतीवरून आयसीसीने स्पर्धा रद्द करण्याची धमकी बीसीसीआयला दिली होती. पण, अखेरच्या क्षणाला हा मुद्दा सुटला अन् भारताने यजमानपद भूषविले. आताही हा वाद सुटला नाही, तर बीसीसीआयला 800 कोटींचा फटका बसणार आहे. आयसीसीकडून दिल्या जाणाऱ्या महसूलातून ही रक्कम कमी करण्यात येईल. ते मान्य नसल्यास बीसीसीआयला स्पर्धआ आयोजनावरून हात गमवावे लागतील.   

Web Title: ODI World Cup 2023 :  The Finance Ministry has revised taxation on sporting events and a 21% tax will be charged for the 50-over World Cup in 2023, BCCI losing staggering Rs 800 Crore from ICC revenue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.