Team India's Fixtures in 2023 : नवीन वर्षात नवीन सुरुवात... २०२२ हे वर्ष भारतीय संघाच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरले.. रोहित शर्मा व राहुल द्रविड यांच्या संघाने द्विदेशीय मालिकेत वर्चस्व गाजवले, परंतु आयसीसी व आशिया चषक स्पर्धेत सपाटून मार खाल्ला... त्यात दुखापतीचे ग्रहण हे मागे लागलेच होते. बांगलादेश दौऱ्यावरही भारताला वन डे मालिका गमवावी लागली. पण, आता २०२३ मध्ये भारतीय संघ ही निराशाजनक कामगिरी मागे टाकून नव्या दमाने मैदानावर उतरण्यासाठी सज्ज आहे. उद्यापासून श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून भारताच्या २०२३च्या प्रवासाची सुरुवात होत आहे.
जानेवारी २०२३ - भारत वि. श्रीलंका
पहिली ट्वेंटी-२० ( ३ जानेवारी ) - मुंबई
दुसरी ट्वेंटी-२० ( ५ जानेवारी ) - पुणे
तिसरी ट्वेंटी-२० ( ७ जानेवारी ) - राजकोट
पहिली वन डे ( १० जानेवारी ) - गुवाहाटी
दुसरी वन डे ( १२ जानेवारी ) - कोलकाता
तिसरी वन डे ( १५ जानेवारी ) - तिरुअनंतपूरम
जानेवारी/फेब्रुवारी - भारत वि. न्यूझीलंड
पहिली वन डे ( १८ जानेवारी ) - हैदराबाद
दुसरी वन डे ( २१ जानेवारी ) - रायपूर
तिसरी वन डे ( २४ जानेवारी ) - इंदूर
पहिली ट्वेंटी-२० ( २७ जानेवारी) - रांची
दुसरी ट्वेंटी-२० ( २९ जानेवारी) - लखनौ
तिसरी ट्वेंटी-२० ( १ फेब्रुवारी ) - अहमदाबाद
फेब्रुवारी/मार्च - भारत वि. ऑस्ट्रेलिया
पहिली कसोटी ( ९ ते १३ फेब्रुवारी ) - नागपूर
दुसरी कसोटी ( १७ ते २१ फेब्रुवारी) - दिल्ली
तिसरी कसोटी ( १ ते ५ मार्च) - धर्मशाला
चौथी कसोटी ( ९ ते १३ मार्च ) - अहमदाबाद
पहिली वन डे ( १७ मार्च) - मुंबई
दुसरी वन डे ( १९ मार्च) - विशाखापट्टणम
तिसरी वन डे ( २२ मार्च) - चेन्नई
मार्च/मे - इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ( तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत)
जून - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल
भारतीय संघ सध्या WTC तालिकेत दुसऱ्या क्रमंकावर आहे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांना कसोटी वर्ल्ड कप फायनल खेळावी लागण्याची शक्यता अधिक आहे.
जुलै/ऑगस्ट - वेस्ट इंडिज वि. भारत
भारतीय संघ दोन कसोटी, तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.
सप्टेंबर - आशिया चषक २०२३ ( पाकिस्तान)
आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु बीसीसीआय सचिव व आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही हे आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा दौरा वादात अडकला आहे.
ऑक्टोबर - भारत वि. ऑस्ट्रेलिया
वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे
ऑक्टोबर/नोव्हेंबर - आयसीसी वन डे वर्ल्ड कप
भारतीय संघ प्रथमच आयसीसी स्पर्धेचे एकट्याने आयोजन करत आहे. १९८३ आणि २०११ नंतर भारताला पुन्हा एकदा वन डे वर्ल्ड कप उंचावण्याची संधी आहे.
नोव्हेंबर/डिसेंबर - ऑस्ट्रेलिया वि. भारत
भारतीय संघ पाच ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर
डिसेंबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: ODI World Cup, WTC final, Asia Cup; Team India's Fixtures in 2023 Starting with Sri Lanka Series, Check out the Full List of Indian cricket team Schedules
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.