Team India's Fixtures in 2023 : नवीन वर्षात नवीन सुरुवात... २०२२ हे वर्ष भारतीय संघाच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरले.. रोहित शर्मा व राहुल द्रविड यांच्या संघाने द्विदेशीय मालिकेत वर्चस्व गाजवले, परंतु आयसीसी व आशिया चषक स्पर्धेत सपाटून मार खाल्ला... त्यात दुखापतीचे ग्रहण हे मागे लागलेच होते. बांगलादेश दौऱ्यावरही भारताला वन डे मालिका गमवावी लागली. पण, आता २०२३ मध्ये भारतीय संघ ही निराशाजनक कामगिरी मागे टाकून नव्या दमाने मैदानावर उतरण्यासाठी सज्ज आहे. उद्यापासून श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून भारताच्या २०२३च्या प्रवासाची सुरुवात होत आहे.
वन डे वर्ल्ड कप २०२३ साठी रिषभ पंतही शॉर्टलिस्ट; BCCI च्या यादीतील 'ते' २० खेळाडू कोण?
जानेवारी २०२३ - भारत वि. श्रीलंकापहिली ट्वेंटी-२० ( ३ जानेवारी ) - मुंबई दुसरी ट्वेंटी-२० ( ५ जानेवारी ) - पुणेतिसरी ट्वेंटी-२० ( ७ जानेवारी ) - राजकोटपहिली वन डे ( १० जानेवारी ) - गुवाहाटीदुसरी वन डे ( १२ जानेवारी ) - कोलकातातिसरी वन डे ( १५ जानेवारी ) - तिरुअनंतपूरम
जानेवारी/फेब्रुवारी - भारत वि. न्यूझीलंडपहिली वन डे ( १८ जानेवारी ) - हैदराबाददुसरी वन डे ( २१ जानेवारी ) - रायपूरतिसरी वन डे ( २४ जानेवारी ) - इंदूरपहिली ट्वेंटी-२० ( २७ जानेवारी) - रांचीदुसरी ट्वेंटी-२० ( २९ जानेवारी) - लखनौतिसरी ट्वेंटी-२० ( १ फेब्रुवारी ) - अहमदाबाद
फेब्रुवारी/मार्च - भारत वि. ऑस्ट्रेलियापहिली कसोटी ( ९ ते १३ फेब्रुवारी ) - नागपूरदुसरी कसोटी ( १७ ते २१ फेब्रुवारी) - दिल्लीतिसरी कसोटी ( १ ते ५ मार्च) - धर्मशालाचौथी कसोटी ( ९ ते १३ मार्च ) - अहमदाबादपहिली वन डे ( १७ मार्च) - मुंबईदुसरी वन डे ( १९ मार्च) - विशाखापट्टणमतिसरी वन डे ( २२ मार्च) - चेन्नई
मार्च/मे - इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ( तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत)
जून - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनलभारतीय संघ सध्या WTC तालिकेत दुसऱ्या क्रमंकावर आहे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांना कसोटी वर्ल्ड कप फायनल खेळावी लागण्याची शक्यता अधिक आहे.
जुलै/ऑगस्ट - वेस्ट इंडिज वि. भारतभारतीय संघ दोन कसोटी, तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. सप्टेंबर - आशिया चषक २०२३ ( पाकिस्तान)आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु बीसीसीआय सचिव व आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही हे आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा दौरा वादात अडकला आहे.
ऑक्टोबर - भारत वि. ऑस्ट्रेलियावन डे वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे
ऑक्टोबर/नोव्हेंबर - आयसीसी वन डे वर्ल्ड कपभारतीय संघ प्रथमच आयसीसी स्पर्धेचे एकट्याने आयोजन करत आहे. १९८३ आणि २०११ नंतर भारताला पुन्हा एकदा वन डे वर्ल्ड कप उंचावण्याची संधी आहे.
नोव्हेंबर/डिसेंबर - ऑस्ट्रेलिया वि. भारतभारतीय संघ पाच ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर
डिसेंबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"