रोहितच्या कसोटी कर्णधारपदावर जसप्रीत बुमराहची नजर? पॅट कमिन्सचं उदाहरण देऊन म्हणाला... 

मार्च २०२२ नंतर जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) पहिली कसोटी मॅच खेळण्यासाठी गुरुवारी हैदराबाद येथे इंग्लंडविरुद्ध मैदानावर उतरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 12:33 PM2024-01-23T12:33:02+5:302024-01-23T12:33:23+5:30

whatsapp join usJoin us
''of course, who wouldn’t?" Is Jasprit Bumrah eyeing Rohit Sharma's Test captaincy post?  | रोहितच्या कसोटी कर्णधारपदावर जसप्रीत बुमराहची नजर? पॅट कमिन्सचं उदाहरण देऊन म्हणाला... 

रोहितच्या कसोटी कर्णधारपदावर जसप्रीत बुमराहची नजर? पॅट कमिन्सचं उदाहरण देऊन म्हणाला... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मार्च २०२२ नंतर जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) पहिली कसोटी मॅच खेळण्यासाठी गुरुवारी हैदराबाद येथे इंग्लंडविरुद्ध मैदानावर उतरणार आहे. इंग्लंडविरुद्धची ही त्याची ११वी कसोटी मॅच असणार आहे आणि मागच्यावेळेस जेव्हा इंग्लंडविरुद्ध खेळला होता, तेव्हा त्याच्याकडे भारतीय संघाचे नेतृत्व होते. खरं म्हटलं तर इंग्लंड दौऱ्यावर जसप्रीतकडे उप कर्णधारपदाची जबाबदारी होती, परंतु मालिकेतील पाचवा सामना स्थगित केला गेला. त्यानंतर तो सामना झाला तेव्हा रोहित शर्माला कोरोनाची लागण झाल्याने माघार घ्यावी लागली आणि जसप्रीतने कर्णधाराची भूमिका बजावली. 

निवृत्ती घेतली तेव्हाच ठरवलेलं देशाविरुद्ध खेळायचे; भारताच्या माजी कर्णधाराचं वादग्रस्त विधान


तो सामना भारताने गमावले असला तरी त्यांनी यजमान इंग्लंडला बॅकफूटवर टाकले होते, परंतु जो रूट व जॉनी बेअरस्टो यांनी आक्रमक फटकेबाजी करून भारताला मागे ढकलले. रूट व बेअरस्टो यांनी ३१६ चेंडूंत २६९ धावांची भागीदारी केली. बुमराहने त्या सामन्यात पाच विकेट्स घेतल्या आणि १६ चेंडूंत नाबाद ३१ धावा केल्या. यातल्या २९ धावा या स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात आल्या होत्या. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये एचा षटकात सर्वाधिक धावा करण्याचा ब्रायन लाराचा विक्रम मोडला होता. ब्रॉडच्या त्या षटकात ३५ धावा आलेल्या आणि ते कसोटी इतिहासातील सर्वात महागडे षटक ठऱले होते. 


हा एक संस्मरणीय सामना होता आणि बुमराहने म्हटले आहे की संधी मिळाल्यास तो भारताच्या कसोटी संघाचे कायमस्वरूपी कर्णधारपद स्वीकारण्यास मागेपुढे पाहणार नाही. ''मी एका कसोटीत संघाचे नेतृत्व सांभाळले आणि ते मी माझे भाग्य समजतो. कसोटी क्रिकेट खेळणे हे चांगले आहेच, त्यात कर्णधारपद भूषवणे हे त्याहून चांगले. आम्ही तो सामना हरलो, परंतु आम्ही त्या सामन्यात पकड बनवली होती. मला जबाबदारी घ्यायला आवडते. एक जलदगती गोलंदाज म्हणून तुम्हाला केव्हाकेव्हा फाईन लेगला जावे लागले आणि सतत जागा बदलावी लागले, परंतु मला प्रत्येक निर्णयात सहभागी व्हायला आवडते आणि संधी दिली तर नक्कीच मी स्वीकारेन. अर्थातच, असे कोण करणार नाही?", असे जसप्रीतने म्हटले.  


'वेगवान गोलंदाज हुशार असतात'
वेगवान गोलंदाज कसोटीत यशस्वी कर्णधार बनल्याची उदाहरणे दुर्मिळ आहेत, परंतु बुमराहच्या समकालीन खेळाडूंपैकी ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स हे एक प्रमुख उदाहरण आहे. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने इंग्लंडमधील अॅशेस राखली आणि मागच्या वर्षी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा व वन डे वर्ल्ड कप जिंकला. बुमराह म्हणाला की, ऑस्ट्रेलियाचे सामने खेळण्याची संख्या भिन्न असू शकते परंतु कमिन्स हे एक चांगले उदाहरण आहे. यापूर्वी जलदगती गोलंदाजांनी असा पराक्रम केला नव्हता, परंतु कमिन्स हा एक उत्तम उदाहरण आहे. त्यांनी अथक मेहनत घेतली आहे आणि सामन्यात काय करावे याची जाण त्याला आहे. 

Web Title: ''of course, who wouldn’t?" Is Jasprit Bumrah eyeing Rohit Sharma's Test captaincy post? 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.