इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात प्ले ऑफच्या शर्यतीत कोलकाता नाईट रायडर्सने ( Kolkata Knight Riders ) कसेबसे आव्हान कायम राखले आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीत ( MI ) KKR ने विजय मिळवून १० गुणांसह प्ले ऑफच्या आशा जीवंत ठेवल्या आहेत. पण, त्यांना एक मोठा धक्का बसला आहे. MI विरुद्ध मॅच विनिंग कामगिरी करणारा गोलंदाज पॅट कमिन्स ( Pat Cummins) याने आयपीएल २०२२मधून माघार घेतली आहे. नितंबच्या दुखापतीमुळे ( hip injury) त्याने माघार घेतली आहे आणि आता तो ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला आहे. दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर तो पुन्हा मैदानावर उतरणार आहे.
- मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीत कमिन्सने तीन विकेट्स घेतल्या होत्या.- त्याच्या या कामगिरीच्या जोरावर कोलकाताने ती लढत ५२ धावांनी जिंकली होती- कोलकाता नाईट रायडर्सचा पुढील सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. - या दुखापतीमुळे कमिन्सला आगामी श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेला मुकावे लागणार आहे. २९
जूनपासून कसोटी मालिकेला सुरूवात होईल आणि त्यात तो संघाचे नेतृत्व करणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स १० गुणांसह ७व्या क्रमांकावर आहेत आणि मुंबई इंडियन्सविरुद्धच्या विजयाने त्यांच्या प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या आहेत. KKR ला आता उर्वरित दोन्ही लढती मोठ्या फरकाने जिंकाव्या लागणार आहेत. त्या लढती जिंकूनही त्यांच्या खात्यात १४ गुणच होतील आणि अन्य तीन संघांच्या कामगिरीवर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल.
''भारतात घालवलेला हा काळ अविस्मरणीय होता आणि KKRचे मी आभार मानतो की त्यांनी माझी व माझ्या कुटुंबियांची योग्य काळजी घेतली. उर्वरित लढतींसाठी मी संघाला शुभेच्छा देतो. मी त्या लढती पाहीन आणि तुमच्यासाठी चिअर करेन,''असे पॅट कमिन्स म्हणाला. कमिन्सने आयपीएल २०२२मध्ये ५ सामन्यांत ७ विकेट्स घेतल्या आहेत आणि त्याच्या नाबाद ५६ धावांच्या खेळीने अनेक विक्रमही मोडले आहेत.