official name of the Ahmedabad based franchise: अहमदाबाद फ्रँचायझीची गुगली; अहमदाबाद टायटन्स नव्हे तर 'या' नावाने खेळणार हार्दिक पांड्याचा संघ 

official name of the Ahmedabad based franchise - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव अहमदाबाद टायटन्स असल्याचा ट्रेंड सोमवारी व्हायरल झाला. त्यानंतर सर्वांनी याच नावावर शिक्कामोर्तब केले. पण,

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 12:44 PM2022-02-09T12:44:08+5:302022-02-09T12:47:23+5:30

whatsapp join usJoin us
official name of the Ahmedabad based franchise- Ahmedabad based new IPL franchise to be called Gujarat Titans | official name of the Ahmedabad based franchise: अहमदाबाद फ्रँचायझीची गुगली; अहमदाबाद टायटन्स नव्हे तर 'या' नावाने खेळणार हार्दिक पांड्याचा संघ 

official name of the Ahmedabad based franchise: अहमदाबाद फ्रँचायझीची गुगली; अहमदाबाद टायटन्स नव्हे तर 'या' नावाने खेळणार हार्दिक पांड्याचा संघ 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

official name of the Ahmedabad based franchise - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव अहमदाबाद टायटन्स असल्याचा ट्रेंड सोमवारी व्हायरल झाला. त्यानंतर सर्वांनी याच नावावर शिक्कामोर्तब केले. पण, आज अधिकृतपणे अहमदाबाद फ्रँचायझीने नाव जाहीर करून गुगली टाकली.  हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे नाव अहमदाबाद टायटन्स नसून फ्रँचायझीने वेगळेच नाव जाहीर केले. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.


संजीव गोएंका यांच्या RPSG Group आणि CVC Capital यांनी विक्रमी किमतीत अनुक्रमे लखनौ व अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. Indian Premier League मध्ये  ( IPL 2022) आता मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, सनयारझर्स हैदराबाद, किंग्स पंजाब, लखनौ व अहमदाबाद असे दहा संघ खेळणार आहेत.  RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी नावावर केली. या नव्या करारानं बीसीसीआयला १२, ६९० कोटींचा फायदा झाला आहे.

CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम आहे. 

आता ही फ्रँचायझी गुजरात टायटन्स या नावाने मैदानावर उतरणार आहे. ( Ahmedabad IPL franchise to be named Gujarat Titans) 

Web Title: official name of the Ahmedabad based franchise- Ahmedabad based new IPL franchise to be called Gujarat Titans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.