Join us  

MS Dhoni Labourer : महेंद्रसिंग धोनी, आंद्रे रसेल बनले मजूर; IPL 2021च्या आधी मोठा घोटाळा उघड

Indian Premier League 2021 : आयपीएलच्या १४व्या पर्वाला सुरूवात होण्यासाठी अवघे ८ दिवस शिल्लक राहिले आहेत. सर्व फ्रँचायझी त्यासाठी सज्ज झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 10:08 AM

Open in App

Indian Premier League 2021 : आयपीएलच्या १४व्या पर्वाला सुरूवात होण्यासाठी अवघे ८ दिवस शिल्लक राहिले आहेत. सर्व फ्रँचायझी त्यासाठी सज्ज झाले आहेत. यूएईत गतवर्षी झालेल्या आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सला ( CSK) साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे यंदाच्या लीगमध्ये CSK व MS Dhoni यांच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. धोनी नेट्समध्ये षटकारांची आतषबाजी करताना दिसला. पण, धोनी सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. काही महिन्यांपूर्वी कोलकाताच्या एका महाविद्यालयात बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी हिनं प्रथम क्रमांक पटकावला अशा बातम्या आल्या होत्या. तिच्या नावाचा गैरवापर केल्याचे नंतर उघडकीस आले. सरकारी योजनांमध्ये अनेकदा अभिनेता व अभिनेत्रींच्या नावाच्या समावेशाच्या बातम्याही येत असतात. अशात एका योजनेत महेंद्रसिंग धोनी व आंद्रे रसेल ( Andre Russell ) यांच्या नावाचा वापर झाल्याचे उघडकीस आले आहे. IPL 2021 : बायो बबलला आणखी एक खेळाडू वैतागला, यावेळी महेंद्रसिंग धोनीच्या CSK ला फटका बसला    

तेंलगणातील हा प्रकार आहे आणि जेथे एका गावातील सरकारी योजनेत धोनी व रसेल यांच्या नावाची नोंद कामगार म्हणून करण्यात आली आहे आणि त्याच्या आडून घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. न्यूज १८ नं दिलेल्या वृत्तानुसार तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यातल्या वडलम गावात रस्ता तयार करण्याचं काम सुरू आहे. हा रस्ता बांधण्यासाठी काम करणाऱ्या मजूरांमध्ये महेंद्रसिंग धोनी व आंद्रे रसेल या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे नाव दिसत आहेत. कंत्राटदारानं कामगारांच्या यादीत या दोन आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचे नाव नमूद केल्याचे आढळल्यानं सर्वत्र चर्चा सुरू आहे.

अंगठ्याच्या ठश्यांवरून काढले जात आहेत पैसे 

सरकारकडून पैसे लुबाडण्यासाठी कंत्राटदाराकडून हा प्रकार केला जात असल्याचेही समोर आले आहे. धोनी व रसेल यांच्या नावासमोर अंगठ्याचे ठसे लावले जात असून सरकारकडून पैसे उकळले जात आहेत. या रस्ता निर्मितीसाठी ७ लाख रुपये खर्च मंजूर केला गेला आहे आणि कंत्राटदारानं खोटी नावं दाखवून पैसे उकळले आहेत.  आता या रस्त्याच्या खर्च २१ लाखांपर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.  

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीतेलंगणा