Team India ODI World Cup 2023: भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बीसीसीआयने काल भारतीय संघाची घोषणा केली. दुखापतीनंतर पुनरागमन करणारा यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुलचा एकही सामना न खेळता संघात समावेश करण्यात आला. तर वनडेत खराब फॉर्मशी झगडणाऱ्या सूर्यकुमार यादवलाही संधी देण्यात आली. युजवेंद्र चहल, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शिखर धवन यासारख्या खेळाडूंना संघात स्थान मिळाले नाही. या 'साऱ्या गोष्टींमध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे, गेल्या ३ वन डे विश्वचषकात निवडलेल्या भारतीय संघांच्या तुलनेत यावेळचा संघ हा सर्वात वयस्क म्हणजेच म्हातारा असल्याचे दिसत आहे. वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या 15 सदस्यीय संघात 7 खेळाडू हे वयाची तिशी ओलांडली आहे. त्यातही संघातील सर्वात वयस्क खेळाडू हा संघाचा कर्णधार रोहित शर्मा असून त्याचे वय 36 वर्षे आहे.
शुभमन गिल हा सर्वात तरुण
वर्ल्ड कप संघातील सर्वात तरुण खेळाडूबद्दल बोलायचे झाले तर सलामीवीर शुभमन गिल सर्वात तरूण आहे. सध्याच्या विश्वचषक संघातील तो 23 वर्षांचा आहे. तर 29 वर्षे पूर्ण करणारे 4 खेळाडू जसप्रीत बुमराह (29), हार्दिक पंड्या (29), मोहम्मद. सिराज (29) आणि अक्षर पटेल (29) हे आहेत.
विश्वचषक संघातील सर्वात वयस्कर खेळाडू:
रोहित शर्मा (36), विराट कोहली (34), रवींद्र जाडेजा (34), मोहम्मद शमी (33), सूर्यकुमार यादव (32), केएल राहुल (31) आणि शार्दुल ठाकूर (31)
विश्वचषक संघातील युवा खेळाडू (३० वर्षांखालील):
शुभमन गिल (23), इशान किशन (25), श्रेयस अय्यर (28), कुलदीप यादव (28), जसप्रीत बुमराह (29), हार्दिक पांड्या (29), मोहम्मद सिराज (29) आणि अक्षर पटेल (29)
गेल्या 3 विश्वचषकांच्या तुलनेत यावेळी सर्वात वयस्क संघ
- 2011 मध्ये निवडलेल्या टीम इंडियाचे सरासरी वय 28.65 वर्षे होते.
- 2015 मध्ये निवडलेल्या संघाचे सरासरी वय केवळ 27.36 वर्षे होते.
- 2019 मध्ये निवडलेल्या संघाचे सरासरी वय 29.92 वर्षे होते.
- यावेळी निवडलेल्या भारतीय संघाचे सरासरी वय 30.07 आहे.
संघ - सर्वात वयस्क खेळाडू - सर्वात युवा खेळाडू
- 2023 - रोहित शर्मा (36 साल) - शुभमन गिल (23 साल)
- 2019 - एमएस धोनी (37 साल) - कुलदीप यादव (24 साल)
- 2015 - एमएस धोनी (33 साल) - अक्षर पटेल (21 साल)
- 2011- सचिन तेंडुलकर (37 साल) - पियूष चावला (22 साल)
Web Title: oldest team India for world cup 2023 Rohit Sharma Eldest cricketer Shubman Gill Youngest see ages of all
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.