Join us  

वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनला दुसऱ्या कसोटीत डच्चू?

न्यूझीलंडविरुद्ध रॉबिन्सनने पहिल्या डावात ७५ धावांत चार गडी बाद केले. मात्र, गोलंदाजीऐवजी आठ वर्षापूर्वी केलेले ट्विट अधिक चर्चेत आहे. ईसीबी अत्यंत संवेदनशील विषयावर कडक कारवाई करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2021 6:52 AM

Open in App

लंडन : लॉर्ड्‌सवर पदार्पण करणारा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन याला आठ वर्षांपूर्वीचे ट्विट भोवले. रॉबिन्सनने २०१२-१३ मध्ये वर्णद्वेषी आणि लैंगिकतेबाबत आक्षेपार्ह ट्विट केले होते. त्याच्यावर टीका होत असल्याने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतून त्याला वगळले जाऊ शकते.न्यूझीलंडविरुद्ध रॉबिन्सनने पहिल्या डावात ७५ धावांत चार गडी बाद केले. मात्र, गोलंदाजीऐवजी आठ वर्षापूर्वी केलेले ट्विट अधिक चर्चेत आहे. ईसीबी अत्यंत संवेदनशील विषयावर कडक कारवाई करणार आहे. भावी खेळाडूंच्या सोशल मीडियाची समीक्षा करण्याचा निर्णयदेखील ईसीबीने घेतला आहे.एका वृत्तानुसार, बोर्डाने रॉबिन्सनच्या वर्तनाचा तपास सुरू केला आहे. रॉबिन्सनला भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनदेखील वगळले जाऊ शकते. त्याने आक्षेपार्ह शब्दांचा वापर करून विशिष्ट धर्मातील लोकांचा दहशतवादाशी संबंध जोडला होता. त्याने आशियाई वंशाच्या महिलांवरही अपमानास्पद भाष्य केले होते. लॉर्ड्समध्ये पदार्पण होताच त्याचे जुने ट्विट व्हायरल झाले.