Join us  

#MeToo मोहिमेला ऑलिम्पिक पदकविजेत्या महिला खेळाडूचा पाठिंबा

विविध क्षेत्रांत महिलांवर होणाऱ्या शोषणाला आता वाचा फुटत आहे. या शोषणाला बळी पडलेल्या महिला पुढकार घेऊन जगासमोर आपल्या व्यथा मांडत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 4:27 PM

Open in App

मुंबई : विविध क्षेत्रांत महिलांवर होणाऱ्या शोषणाला आता वाचा फुटत आहे. या शोषणाला बळी पडलेल्या महिला पुढकार घेऊन जगासमोर आपल्या व्यथा मांडत आहेत. त्यांच्या या #MeToo मोहिमेला भारताची ऑलिम्पिक पदकविजेत्या बॅडमिंटनपटू पी. व्ही सिंधूने पाठिंबा दिला आहे. 

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर लावलेल्या आरोपानंतर बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिमेने वेग घेतला.  त्यानंतर अभिनेते आलोकनाथ यांच्यावर ‘तारा’ या लोकप्रिय मालिकेच्या निर्मात्या आणि लेखिका विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केला आहे. भारताची आघाडीच्या महिला बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने तिच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींबद्दल खुलासा केला. 

सिंधूने #MeToo मोहिमेला पाठिंबा देताना सांगितले की,''या शोषणात बळी पडलेल्या महिला पुढे येऊन त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडत आहेत. त्या सर्वांचे कौतुक. त्यांचा मी आदर करते.'' मात्र, ज्वाला गुट्टाच्या आरोपाबाबत विचारले असता सिंधू म्हणाली, ''वरिष्ठ आणि प्रशिक्षकांबद्दल मला माहित नाही. मी गेली अनेक वर्ष क्रीडा क्षेत्रात आहे आणि माझ्यासोबत कोणत्याही वरिष्ठ आणि प्रशिक्षकांनी अशी वागणुक केलेली नाही.''

टॅग्स :मीटूपी. व्ही. सिंधू