कराची : जो खेळाडू खेळाला बट्टा लावतो, त्याच्यावर बंदी घातली जाते. मग तो कोणताही खेळ का असू नये. पण पाकिस्तानच्या एका खेळाडूवर चक्क फिक्सिंगचे आरोप आहेत, पण त्यानंतरही पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने त्याला खेळण्याची परवानगी दिल्याचे पाहायला मिळत आहे.
पाकिस्तानच्या संघातील फलंदाज शरजिल खान हा स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळला होता. पण आता त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची परवानगी पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने दिली आहे. शरजिल हा 2017 मध्ये स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळला होता. त्यानंतर पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने त्याच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. पण आज, सोमवारी त्याच्यावरील बंदी उठवण्याचा निर्णय पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने घेतला आहे.
शरजिलने पाकिस्तानकडून २५ एकदिवसीय आणि एक कसोटी सामना खेळला आहे. २०१७ साली पाकिस्तान क्रिकेट लीगमधील एका सामन्यात स्पॉट फिक्संग केल्याप्रकरणी शरजिल हा दोषी ठरला होता. त्यानतर पाकिस्तानने त्याच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्याची शिक्षा २०२२ साली संपत होती. पण आज फक्त दोन वर्षांमध्ये त्याच्यावरील बंददी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शरजिलने पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या भ्रष्टाचारविरोधी अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची बिनशर्त माफी मागितली. त्यानंतर त्याच्यावरील बंदी आज उठवण्यात आली आहे.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाने याबाबत सांगितले की, "शरजिलने स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बिनशर्त माफी मागितली आहे. आतापर्यंत दोन वर्षांच्या बंदची शिक्षा त्याने भोगली आहे. आपल्या माफीनाम्यामध्ये त्याने फक्त पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाचीच माफी मागितलेली नाही तर क्रिकेटशी संलग्न असलेल्या साऱ्यांची माफी मागितली आहे. त्याचा माफीनामा आम्ही प्रसिद्ध केला आहे. "