भारतीय संघातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक नाव म्हणजे सुरेश रैना ( Suresh Raina)... त्यानं गतवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी स्थानिक क्रिकेट आणि इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL) त्याची फटकेबाजी पाहण्याची संधी मिळणार आहे. तो आजही चपळ क्षेत्ररक्षक आहे आणि याची प्रचिती शनिवारी आली. रैना सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-20 स्पर्धेत ( Syed Mushtaq Ali T20 tournament ) उत्तर प्रदेश संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.
रैनानं 18 कसोटी, 226 वन डे आणि 78 ट्वेंटी-20 सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानं कसोटीत 768 धावा व 13 विकेट्स घेतल्या आहेत. वन डे त त्याच्या नावावर 5615 धावा व 36 विकेट्स, तर ट्वेंटी-20त त्यानं 1605 धावा व 13 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 त शतक करणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे. शनिवारी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत त्रिपुरा संघाविरुद्धच्या सामन्यात रैनानं अविश्वसनीय रन आऊट केला. त्यानं त्रिपुराचा कर्णधार मणिशंकर मुरासिंग याला माघारी जाण्यास भाग पाडले. स्टम्प्सकडे न पाहताच रैनानं हा रन आऊट केला.
२०१६च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप मध्ये न्यूझीलंडविरुद्ध रैनानं असाच रन आऊट केला होता. नॉन स्ट्रायकर एंडला असणाऱ्या ब्रेंडन टेलरला त्यानं धावबाद केले होते. त्याचीच पुनरावृत्ती रैनानं त्रिपुराविरुद्धच्या सामन्यात केली.
पाहा व्हिडीओ...