RCB New Bowling Coach IPL 2025 : आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. या लिलावात उतरुन संघ बांधणी करण्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( RCB) संघानं एक मोठा डाव खेळला आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित अशा रणजी करंडक स्पर्धेत मुंबई संघाला गतवैभव मिळवून देणारा पडद्यामागचा चॅम्पियन चेहऱ्याला ते आपल्या संघात घेणार आहेत.
कोण आहे तो पडद्यामागचा चॅम्पियन चेहरा?
लिलावात खेळाडूंवर बोली लावण्याआधी RCB च्या संघाने आगामी हंगामासाठी आपला गोलंदाजी कोच कोण असणार ते ठरवलं आहे. रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरुचा संघ ओंकार साळवी यांना गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्त करणार आहे. पहिल्या वहिल्या ट्रॉफीच्या प्रतिक्षेत असलेल्या आरसीबी संघाच्या गोलंदाजीवर प्रत्येक हंगामात चर्चा रंगत असते. कळीचा मुद्दा ठरणाऱ्या गोष्टीवर तोडगा काढण्यासाठी या संघानं बॉलिंग कोचिंगसंदर्भातील मोठा निर्णय घेतल्याचे दिसते.
मुंबईच्या संघाला जिंकून दिली होती मानाची ट्रॉफी
ओंकार साळवी यांनी भारतीय संघाकडून एकही सामना खेळलेला नाही. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांचा बोलबाला राहिला आहे. रणजी क्रिकेटमधील गत वैभव हरवलेल्या मुंबईच्या संघाला गत हंगामात रणजी स्पर्धेचे जेतेपद मिळवून देणारे कोच अशी ही त्यांची एर ओळख सांगता येईल. याआधी त्यांनी आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यात सहाय्यक प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. पण केकेआरनंतर ते आयपीएलमधील कोणत्याही संघाशी कनेक्ट झाले नाहीत. यामागही एक खास कारण आहे.
हा चेहरा सध्या काय करतो?
ओंकार साळवी हे मुंबई क्रिकेट असोसिएशनसोबत करारबद्ध झाल्यामुळे ते आयपीएपासून दूर होते. सध्याच्या घडीला ते मुंबई संघाचे मुख्य कोच आहेत. मार्च २०२५ मध्ये त्यांचा करार आणि कार्यकाळ संपुष्टात येईल. अर्थात हा चेहरा मुंबईच्या ताफ्यातून रिलीज होईल. त्यानंतर ते RCB च्या माध्यमातून पुन्हा एकदा आयपीएलशी कनेक्ट होतील. इंडियन एक्स्प्रसच्या वृत्तानुसार RCB नं ओंकार साळवी यांना गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्त केले असून लवकर याची अधिकृत घोषणा केली जाईल.
Web Title: Omkar Salvi New Bowling Coach For Virat Kohli RCB IPL 2025 Reports
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.