T20 World Cup 2024, OMN vs SCOT Live : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूयॉर्कमध्ये भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानसमोर गुडघे टेकलेले असताना नॉर्थ साऊंडमध्ये भारतीय फलंदाजाने मैदान गाजवलेले पाहायला मिळाले. पण, हा भारतीय फलंदाज ओमान ( Oman) संघासाठी मैदान गाजवतोय.. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ब गटात आज ओमान विरुद्ध स्कॉटलंड असा सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना ओमानने दमदार फकटेबाजी केली. सलामीवीर प्रतिक आठवले ( Pratik Athavale ) याने मैदान गाजवले. त्याने ४० चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५४ धावा करताना स्कॉटलंडसमोर ७ बाद १५० अशी आव्हानात्मक धावसंख्या उभी केली.
प्रतिक आठवले याला लहानपणी झोपण्यापूर्वी वडिलांसोबत क्रिकेट खेळायला आवडायचे आणि त्याशिवाय तो झोपायचा नाही. गली क्रिकेट खेळताना त्याने अनेकांच्या घराच्या काचा फोडल्या आणि वडिलांनी त्याला क्रिकेटच्या मैदानात पाठवले. इथून त्याचा क्रिकेट प्रवास सुरू झाला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निमंत्रित सामन्यांमध्ये तो नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडून खेळला. त्याने विद्यापीठ स्तरावर पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले आणि कांगा लीगमध्ये खेळण्यासाठी मुंबईलाही गेले.
पण, भारतीय क्रिकेटमध्ये संधी आपल्या वाट्याला येणार नाही, हे समजताच त्याने ओमानमध्ये नोकरी पत्करली आणि आखाती देशात क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तेथे त्याने आपल्या कौशल्याच्या जोरावर ओमानच्या राष्ट्रीय संघात जागा पटकावली. प्रतिकने ओमानने दाखवलेल्या विश्वासाची परतफेड केली आणि त्यांना वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत सुरू असलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे तिकीट मिळवून देण्यात मदत केली. प्रतिकने त्याच्या प्रवासाबाबत द हिंदू या इंग्रजी यांच्याशी गप्पा मारताना सांगितले होते.
Web Title: OMN vs SCOT Live : Nashik boy Pratik Athavale, star of the Oman cricket in T20 World Cup 2024, read his journey, Scotland need 151 runs to win
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.