Join us  

PAK vs NZ: सेमीफायनलपूर्वी शाहिन आफ्रिदीने हातात तिरंगा घेऊन जिंकली मनं; सासऱ्याच्या पावलावर पाऊल!

Shaheen Afridi T20 World Cup 2022 : आज विश्वचषकात पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 1:01 PM

Open in App

सिडनी : ऑस्ट्रेलियात रंगलेल्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानी संघाने जागा मिळवली आहे. शेजाऱ्यांचा उपांत्य फेरीतील सामना आज न्यूझीलंडविरूद्ध होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजल्यापासून या सामन्याला सुरूवात होईल. मात्र या बहुचर्चित सामन्याच्या पूर्वसंध्येला एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले. पाकिस्तान संघाचा स्टार वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी सिडनीमध्ये चाहत्यांना भेटत असताना त्याने भारताचा तिरंगा हातात घेतला. हातात तिरंगा घेतलेल्या आफ्रिदीचा फोटो खूप व्हायरल होत आहे. 

चाहत्याला तिरंग्यावर दिला ऑटोग्राफ शाहिन आफ्रिदीने हातात तिंरगा घेऊन त्याच्यावर ऑटोग्राफ दिला. याबाबत चाहत्यांनी म्हटले की शाहिन त्याचे भविष्यातील सासरे आणि पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. तर काही युजर्स शाहिनवर अशा देखील प्रतिक्रिया देत आहेत की, शाहिनने उपांत्य फेरीपूर्वीच हातात तिरंगा घेतला. 

दरम्यान, पाकिस्तानी संघ उपांत्य फेरीसाठी सिडनीला पोहचला आहे. यादरम्यान चाहते त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूंना भेटायला आले होते. तेवढ्यात एका भारतीय चाहत्याने शाहिनला तिरंगा दिला आणि त्यावर ऑटोग्राफ करायला सांगितले. चाहत्याचा आग्रह पाहता शाहिनने देखील तिरंगा हातात घेतला आणि त्यावर ऑटोग्राफ दिला. 

सासऱ्याच्या पावलावर पाऊलशाहिन आफ्रिदी हा पाकिस्तानी संघाचा दिग्गज शाहिद आफ्रिदीचा होणारा जावई आहे. शाहिन शाहचे शाहिद आफ्रिदीच्या मुलीशी लग्न होणार आहे. अशा परिस्थितीत आता शाहिनही सासऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचे चाहते म्हणत आहेत. खरं तर २०१८च्या सुरुवातीला स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या स्पर्धेदरम्यान शाहिद आफ्रिदीला चाहत्यांनी अशाच पद्धतीने घेरले होते. त्यावेळी शाहिद आफ्रिदी भारतीय चाहते आणि तिरंग्यासोबत उभा असल्याचे पाहायला मिळते. आफ्रिदीने त्यांच्यासोबत फोटोसाठी पोजही दिली, मात्र तिरंग्याकडे लक्ष जाताच तो पूर्णपणे फडकताना दिसला नाही. त्यानंतर शाहिदने चाहत्याला सांगितले, 'झेंडा सरळ करा' आणि त्यानंतरच फोटो काढला. त्यानंतर तिरंग्याबद्दलच्या या आदरानंतर आफ्रिदीचे सोशल मीडियावर खूप कौतुक झाले होते.

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२पाकिस्तानन्यूझीलंडशाहिद अफ्रिदीभारत
Open in App