Mumbai Indians । मुंबई : आज २७ फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषा दिन सर्वत्र साजरा केला जात आहे. जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात इंडियन प्रीमियर लीगची (IPL) फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने देखील मराठी भाषा दिनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये सूर्यकुमार यादवने मारलेल्या फटकाराला सुपला शॉट असा आवाज देण्यात आला आहे. तसेच या शॉर्टवर चाहत्यांनी लय भारी, एक नंबर भावा, मस्तच शॉर्ट अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले. "सूर्या चा सुप्ला शॉट आणि पलटन च्या रिएक्शंस. मराठी म्हणजे आपुलकी! मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा", अशा शब्दांत मुंबई इंडिन्सच्या फ्रँचायझीने मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. 31 मार्चपासून या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. आयपीएलचा पहिला सामना गतविजेत्या गुजरात जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे.
IPL 2023 साठी मुंबई इंडियन्सचा संघ - रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, जोफ्रा आर्चर, टीम डेव्हिड. डेवॉल्ड ब्रेव्हिस, जसप्रीत बुमराह, हृतिक शोकिन, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, तिलक वर्मा, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेया, आकाश माधवाल, त्रिस्तान स्तब्स, रमणदीप सिंग, कॅमेरून ग्रीन, झाय रिचर्डसन, राघव गोयल.
आयपीएल 2023साठी मुंबई इंडियन्सचे वेळापत्रक -
- 2 एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स, बंगळुरू - सायंकाळी 7.30 वा. पासून
- 8 एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई - सायंकाळी 7.30 वा. पासून
- 11एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स, दिल्ली - सायंकाळी 7.30 वा. पासून
- 16 एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई - दुपारी 3.30 वा.पासून
- 18 एप्रिल - स नरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, हैदराबाद - सायंकाळी 7.30 वा.पासून
- 22 एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स, मुंबई - सायंकाळी 7.30 वा.पासून
- 25 एप्रिल- गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, अहमदाबाद - सायंकाळी 7.30 वा.पासून
- 30 एप्रिल- मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, मुंबई - सायंकाळी 7.30 वा.पासून
- 3 मे - पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स, मोहाली - सायंकाळी 7.30वा.पासून
- 6 मे - चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई - दुपारी 3.30 वा. पासून
- 9 मे - मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई - सायंकाळी 7.30 वा.पासून
- 12 मे - मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स, मुंबई - सायंकाळी 7.30 वा.पासून
- 16 मे - लखनौ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स लखनौ, - सायंकाळी 7.30 वा.पासून
- 21 मे - मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, मुंबई - दुपारी 3.30 वा.पासून
Web Title: On the occasion of Marathi Language Day, Mumbai Indians have shared a video conveying a message of affection and wished them well
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.