Join us  

Rohit Sharma scored 140 against Pakistan : जेव्हा मी पाकिस्तानचा प्रशिक्षक बनेन...!; Mumbai Indians कडून रोहित शर्माचा 'तो' Video व्हायरल

संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानने प्रथमच भारतीय संघावर विजय मिळवण्याची किमया केली. आता त्याची परतफेड करण्याची संधी भारताला मिळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 1:51 PM

Open in App

Rohit Sharma scored 140 against Pakistan : भारत-पाकिस्तान हे दोन संघ क्रिकेटच्या मैदानावर समोरासमोर आले की वातावरणातील तापमान अधिकच वाढते. संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानने प्रथमच भारतीय संघावर विजय मिळवण्याची किमया केली. आता त्याची परतफेड करण्याची संधी भारताला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात मिळणार आहे. जेव्हा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पाकिस्तानचा सामना करेल... रोहितची बॅट ही पाकिस्तानविरुद्ध चांगलीच तळपते, म्हणूनच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत रोहितला  लगेच बाद करताच पाकिस्तानच्या खेळाडूंनी जल्लोष केला होता. त्यांना २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील हिटमॅनची वादळी खेळीची धास्ती होती.  आजच्याच दिवशी तीन वर्षांपूर्वी रोहितने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत मॅच विनिंग १४० धावा केल्या होत्या. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५ बाद ३३६ धावा केल्या होत्या. लोकेश राहुल व रोहित यांनी पहिल्या विकेटसाठी १३६ धावांची मजबूत भागीदारी केली. लोकेश ५७ धावांवर माघारी परतला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली व रोहितने पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनीही ९८ धावा जोडल्या. रोहितने ११३ चेंडूंत १४ चौकार व ३ षटकारांसह १४० धावा केल्या, तर विराटने ७७ धावा चोपल्या. 

पावसाच्या व्यत्ययामुळे पाकिस्तानसमोर ४० षटकांत ३०२ धावांचे लक्ष्य ठेवले गेले आणि त्यांना ६ बाद २१२ धावा करता आल्या. फखर जमान ( ६२), बाबर आजम ( ४८) व इमान वासीम ( ४६*) यांनी संघर्ष केला. विजय शंकर, हार्दिक पांड्या व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. रोहितला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार दिला गेला. या सामन्यानंतर रोहित पत्रकार परिषदेत आला. तेव्हा पाकिस्तानच्या संघाला काय सल्ला देशील असा प्रश्न त्याला विचारला गेला आणि त्यावर त्याने गमतीने मी जेव्हा पाकिस्तानचा प्रशिक्षक बनेन तेव्हा सांगेन असे म्हटले होते. मुंबई इंडियन्सने तो व्हिडीओ आज पोस्ट केला. 

 रोहितची दमदार खेळी 

टॅग्स :रोहित शर्माभारत विरुद्ध पाकिस्तानमुंबई इंडियन्स
Open in App