मालाहाइड : वन डेत दोन नवीन चेंडू खेळविण्याची शिफारस झाली त्यावेळी सचिन तेंडुलकरने ‘क्रिकेटची वाट लावण्याचे साधन’ अशी टीका केली होती. सचिनचे शब्द किती खरे आहेत, हे टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याच्या वक्तव्यावरून सिद्ध झाले. उमेशनेही दोन चेंडूंच्या वापरावर टीका करीत रिव्हर्स स्विंगची कला संपुष्टात आल्याने वेगवान गोलंदाजांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.
आयसीसीने २०११ मध्ये वन डेत दोन नवे चेंडू वापरण्यास परवानगी दिली. तेव्हापासून वन डेत मोठ्या धावसंख्येची नोंद होऊ लागली. अलीकडे इंग्लडने आॅस्ट्रेलियाविरुद्ध विश्वविक्रमी ४८१ धावा नोंदविल्या होत्या.
यावर उमेश म्हणाला, ‘दोन नव्या चेंडंूमुळे वेगवान गोलंदाजांसाठी धावांवर आवर घालणे कठीण होत आहे. एकच चेंडू असायचा त्यावेळी तो लवकर जुना होत होता. त्यावर रिव्हर्स स्विंग करणे सोपे होते. नव्या चेंडूमध्ये रिव्हर्स स्विंगची मजा संपली. यॉर्कर देखील चांगला टाकता येत नाही. ’
इंग्लंडमध्ये नव्या दोन चेंडूंच्या वापरामुळे वेगवान गोलंदाजांपुढे अनेक अडचणी येत असल्याचे उमेशने सांगितले. तो पुढे म्हणाला, ‘डेथ ओव्हरमध्ये चेंडूत हालचाल नसेल तर दडपण झुगारण्यास फार त्रास होतो. पाटा खेळपट्टीवर तर वेगवान गोलंदाज अधिक निष्प्रभ ठरतात. इंग्लंडमध्ये पाटा खेळपट्टीवर नियमितपणे क्रिकेट खेळले जाते. वेगवान गोलंदाजांसाठी ही स्थिती पूरक नाहीच. मात्र आम्ही चांगले खेळत असल्याने इंग्लंड दौऱ्यात आम्हाला या परिस्थितीचा अडसर जाणवणार
नाही.’ (वृत्तसंस्था)
संधीची प्रतीक्षा करत असतो
आंतरराष्टÑीय क्रिकेटमध्ये फार कमी संधी मिळाल्याचे दु:ख आहे काय, असे विचारातच उमेश म्हणाला, ‘नाही, असे मुळीच नाही. आगामी इंग्लंड दौºयासाठी मी सज्ज आहे.’ टी-२० मध्ये पाच वर्षांनंतर पुनरागमन करीत उमेशने आयर्लंडविरुद्ध १९ धावा देत दोन गडी बाद केले.
अलीकडे कामगिरीत सर्वांत वेगाने बदल घडविणारा गोलंदाज म्हणून उमेशकडे पाहिले जाते. तरीही स्थानिक दौºयात तो बाहेर राहिला, शिवाय द. आफ्रिका दौºयासाठी त्याचा विचार झाला नव्हता.
- अधिक संधी मिळत नसल्याबद्दल तो पुढे म्हणाला, ‘संघ सध्या संतुलित आहे. भुवनेश्वर आणि जसप्रीत बुमराह यांच्या सोबतीला मोहम्मद शमी चांगली कामगिरी करीत असल्याने संधी मिळणे कठीण झाले होते. संघ व्यवस्थापनाने रोटेशननुसार संधी देण्याचे धोरण अवलंबले आहे, मी तर केवळ संधीची प्रतीक्षा करीत असतो.’
Web Title: One day the 'reverse swing' ended due to two new balls
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.