कोलंबो : श्रीलंका क्रिकेट सध्या संघर्षातून जात आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये या वर्षात त्यांची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. अशा स्थितीत संघाच्या निवडीवर श्रीलंकेचे क्रीडामंत्री दयासिरी जयसेकरा हे नाराज आहेत. भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी रवाना होणाºया ९ क्रिकेटपटूंना रोखत मंत्री जयसेकरा यांनी जबर धक्का दिला आहे. सोमवारी रात्री हे सर्व खेळाडू भारतात रवाना होण्यासाठी निघाले होते. त्यांना कोलंबो विमानतळावरूनच परत बोलविण्यात आले. मंत्र्यांच्या या निर्णयाचा श्रीलंकन मंडळालाही धक्का बसला. श्रीलंका संघातील एका सदस्याने वृत्तसंस्थेला ही गोपनीय माहिती दिली.
श्रीलंकेचे इतर खेळाडू हे भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहेत. एकदिवसीय संघ निवडल्यानंतर त्यास अंतिम मंजुरी मिळण्याआधीच खेळाडूंना रवाना होण्याची परवानगी देण्यात आली होती. यावर क्रीडामंत्री नाराज झाले होते. त्यामुळे त्यांनी या ९ खेळाडूंना भारतात जाण्यास थांबवले. श्रीलंकेच्या क्रीडामंत्र्यांना १९७३ च्या नियमानुसार राष्ट्रीय संघात बदल करण्याचा अधिकार मिळालेला आहे. मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, श्रीलंका बोर्डाने जो संघ निवडलेला आहे. त्यात जयसेकरा हे कमीत कमी दोन बदल करू शकतात. मात्र, त्यांची अंतिम मंजुरी न घेताच बोर्डाने हा संघ जाहीर केला. दरम्यान, ज्या ९ खेळाडूंना रोखण्यात आले तर कर्णधार थिसारा परेरा, उपुल थरंगा, धनुष्का गुणतिलका, असेला गुणरत्ने, चतुरंगा डिसिल्वा, सचित पातिराना, दुश्मंता चमिरा, कुसाल परेरा आणि नुवान प्रदीप यांचा समावेश आहे. भारताविरुद्ध श्रीलंकेचा पहिला एकदिवसीय सामना धर्मशाळा येथे १० डिसेंबर रोजी, दुसरा मोहाली येथे १३ डिसेंबर रोजी आणि तिसरा विशाखापट्टनम येथे १७ डिसेंबर रोजी होईल. (वृत्तसंस्था)
अखेर मंत्र्यांची मंजुरी, संघ घोषित
कसोटी कर्णधार दिनेश चंदिमल याने भारताविरुद्ध तिसºया कसोटी सामन्यात झुंजार शतक झळकावल्यानंतरही त्याला १६ सदस्यीय संघात स्थान मिळाले नाही. थिसारा परेराचा संघ क्रीडामंत्री दयासिरी जयसेकरा यांच्या मंजुरीनंतर घोषित करण्यात आला. आता हा संघ ६ डिसेंबरला भारताकडे रवाना होईल. अष्टपैलू असेला गुणरत्ने आणि सलामीवर धनुष्का गुणतिलका यांनी संघात पुनरागनम केले आहे.
श्रीलंका संघ : थिसारा परेरा (कर्णधार), उपुल थरंगा, धनुष्का गुणतिलका, लाहिरू तिरिमाने, एंजेलो मैथ्यूज, असेला गुणरत्ने, निरोशन डिकवेला, चतुरंगा डि सिल्वा, अकिला धनंजया, सुरंगा लकमल, नुवान प्रदीप, सदीरा समरविक्रम, धनंजय डिसिल्वा, दुश्मंता चमिरा, सचित पातिराना आणि कुसाल परेरा.
Web Title: One-day series: Sri Lankan players have been stopped by the ministers !, 9 players return from the airport
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.