कोलंबो : श्रीलंकेविरुद्ध शुक्रवारी १३२ धावांची फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल असणाºया खेळपट्टीवर केलेली खेळी ही सर्वोत्तम खेळींपैकी एक असल्याचे मत भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने व्यक्त केले. त्याचप्रमाणे या कसोटीत फलंदाजांना प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागण्याची भाकीतही त्याने केले. अजिंक्य रहाणे याने चेतेश्वर पुजारा (१३३) याच्या साथीने चौथ्या गड्यासाठी २१७ धावांची भागीदारी केली आणि भारताला पहिल्या दिवशी ३ बाद १३३ अशा कठीण परिस्थितीतून सावरले. रहाणे म्हणाला, ‘ही फिरकी गोलंदाजांविरुद्ध सर्वोत्तम खेळींपैकी एक आहे. माझे लक्ष हे दबाव ठेवण्यावर होते. फलंदाजीस जाताना ही विकेट कशी असेल, त्यावर किती उसळी असेल आणि माझ्या खेळास अनुकूल असेल किंवा नाही याची मला जाण होती. सामना जसजसा पुढे सरकेल तसतसे या खेळपट्टीवर फलंदाजी करणे आणखीच कठीण होईल.’ या मालिकेत भारताची भक्कम बाजू म्हणजे श्रीलंकेचे विशेषत: रंगना हेराथचा केलेला सामना. रहाणेने यजमान फिरकी गोलंदाजांचा सामना करण्यासाठी आमच्याकडे विशेष व्यूहरचना होती, असे सांगितले. तो म्हणाला, ‘जेव्हा आम्ही याआधी श्रीलंकेविरुद्ध खेळलो होतो व विशेषत: गाले कसोटीनंतर आम्ही हेराथविरुद्ध पदलालित्याचा उपयोग करणे महत्त्वपूर्ण असेल हे ठरवले होते. त्यामुळे त्याच्या आणि त्यांच्या फिरकी गोलंदाजांविरुद्ध फुटवर्कचा उपयोग आम्ही करू इच्छित होतो. ज्यामुळे बॅकफूटवर अधिक धावा करू शकू.विशेषत: संथ आणि कोरड्या असणाºया अशा प्रकारच्या खेळपट्टीवर आम्ही फुटवर्कचा उपयोग करून जास्त धावा करू शकतो हे आम्हाला माहीत होते. काही चेंडू उसळत होते आणि काही खाली राहत होते. जर त्यांनी स्विपचा फटका खेळला तर ते आमच्यासाठी हितकारक ठरेल. आणि आमच्याकडे विकेट घेण्याची संधी असेल.’ (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ‘फिरकीविरुद्ध माझ्या सर्वोत्तम खेळींपैकी एक’: अजिंक्य रहाणे
‘फिरकीविरुद्ध माझ्या सर्वोत्तम खेळींपैकी एक’: अजिंक्य रहाणे
श्रीलंकेविरुद्ध शुक्रवारी १३२ धावांची फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल असणाºया खेळपट्टीवर केलेली खेळी ही सर्वोत्तम खेळींपैकी एक असल्याचे मत भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने व्यक्त केले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 1:08 AM