Join us  

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप संघात एका गोलंदाजाची जागा रिक्त; विराट कोहलीनं स्पष्ट केलं चित्र

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 4:22 PM

Open in App

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतून टीम इंडिया वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागणार आहे. यापुढील प्रत्येक ट्वेंटी-20 मालिका ही वर्ल्ड कप स्पर्धेच्या निमित्तानं सर्व खेळाडूंसाठी महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे प्रत्येक जण दमदार कामगिरी करून टीम इंडियात प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल हे नक्की. पण, कर्णधार विराट कोहलीनं गुरुवारी वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघाबद्दल महत्त्वाची माहिती दिली. त्यानं आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडण्यात येणाऱ्या संघात केवळ एकाच जलदगती गोलंदाजाची जागा रिक्त असल्याचे संकेत दिले. 

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरं जाताना विराटनं ही माहिती दिली. तो म्हणाला,''वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात एका स्थानासाठी चुरस आहे आणि जवळपास तीन गोलंदाजांनी आपलं स्थान पक्कं केलं आहे. ही चुरशीची स्पर्धा होणार आहे आणि यात कोण बाजी मारतं हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह ही अनुभवी जोडी आमच्याकडे आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यांची कामगिरी सातत्यपूर्ण झाली आहे. दीपक चहरही चांगली कामगिरी करत आहे.''

रिषभ पंतला विंडीज मालिकेत महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडण्याची संधी

विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यात पुन्हा चढाओढ; पाहा कुणाची बाजू वरचढ

तो पुढे म्हणाला,''मोहम्मद शमीनं झोकात पुनरागमन केलं आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी अपेक्षित आहे, हे त्यानं समजून घेतलं तर तो ऑस्ट्रेलियातील खेळपट्टींवर उपयुक्त ठरू शकतो. कसोटीत त्यानं चांगला जम बसवला आहे. यॉर्कर माराही त्याला चांगल्या प्रकारे जमत आहे.''

एक षटकार अन् रोहित शर्मा बसणार विक्रमाच्या शिखरावर! 

लोकेश राहुलला पहिल्याच सामन्यात धोनी, विराटच्या पंक्तित बसण्याची संधी 

कोहलीच्या वक्तव्यावरून बुमराह,  कुमार आणि शमी यांचे वर्ल्ड कप संघातील स्थान पक्कं असल्याचा तर्क लावला जात आहे. शमीनं 2017मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामना खेळला होता. भुवीही दुखापतीतून सावरताना संघात कमबॅक करत आहे. त्यानंही ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरचा ट्वेंटी-20 सामना खेळला होता. कोहली म्हणाला,''तीन प्रमुख गोलंदाजांसह एका जागेसाठी अनेक गोलंदाजांची चाचणी होईल. प्रत्येक जण सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे.'' 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजआयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020विराट कोहलीजसप्रित बुमराहभुवनेश्वर कुमारमोहम्मद शामी