नवी दिल्ली : भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचा मागील वर्षाच्या अखेरीस अपघात झाला होता. अपघातानंतर सुरूवातीला उत्तराखंडमधील डेहराडून येथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर पंतवर मुंबईत उपचार सुरू होते. रिषभ पंत आपल्या कुटुंबासोबत नवीन वर्ष साजरे करण्यासाठी घरी परतत असताना त्याच्या कारला अपघात झाला. पंत स्वतः कार चालवत होता आणि रुरकीजवळ त्यांच्या कारला अपघात झाला. लक्षणीय बाब म्हणजे पंतची रिकव्हरी जलद गतीने सुरू आहे, या अपघातानंतर त्याने प्रथमच त्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने मन जिंकणारे कॅप्शन लिहले आहे.
पंतला प्राथमिक उपचारांसाठी डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पंतला त्यांच्या देखरेखीखाली मुंबईला आणण्यास सांगितले. पंत जवळपास सहा महिने क्रिकेटपासून दूर असल्याचे मानले जात आहे. अशातच दोन फोटो शेअर करत पंतने लिहिले, "एक पाऊल पुढे, एक पाऊल मजबूत, एक पाऊल चांगले."
खरं तर रिषभ पंतने दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो काठीचा आधार घेऊन चालत आहे. पंतच्या दोन्ही पायांना अद्याप प्लास्टर केल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, तो इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार नसल्याचे सौरव गांगुली यांनी आधीच स्पष्ट केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"