कोरोना व्हायरसच्या काळात सर्वांना घरीच रहावे लागत आहे. हे संकट कधी संपणार? पूर्वीसारखी परिस्थिती कधी होणार? घराबाहेर पडता येणार की नाही? आदी बरेच प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात घर करून बसले आहेत. या संकटावर मात करण्यासाठी संयम हाच एक मार्ग आहे. या संकटकाळामुळे इंडियन प्रीमिअर लीगवरही अनिश्चिततेचं सावट आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची हिरमोड झाली आहे. या संकटासमोर खचून न जाता त्याचा सामना करण्याची गरज आहे आणि ते समजावून सांगण्यासाठी भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकाला नक्कीच लढण्याचे बळ मिळेल... (Virender Sehwag shares video of Indian soldiers doing bhangra on Indo-Pak border)
या व्हिडीओत भारतीय सैनिक पंजाबी डान्स करताना पाहायला मिळत आहे. भारत-पाकिस्तान सीमेनजीक पहारा देणाऱ्या सैनिकांचा हा व्हिडीओ आहे. सेहवागनं लिहिलं की,''आव्हानांचा आनंदानं सामना करण्याचं धाडस फार कमी लोकांकडे असतं. भारत-पाक सीमेनजीक सैनिक भांगडा करत आहेत. त्यांचा हा जल्लोष आणि एनर्जी पाहताना आनंद वाटतोय.'' (Virender Sehwag shares video of Indian soldiers doing bhangra on Indo-Pak border)
पाहा व्हिडीओ...
यूएईत की महाराष्ट्रात? IPL 2020 चं भविष्य ठाकरे अन् मोदी सरकारच्या हातात!
तीन टीम, एक मॅच; आज रंगणार क्रिकेटचा जबरदस्त सामना, जाणून घ्या संघ, वेळ अन् नियम!
बीसीसीआयला मोठा धक्का, IPLच्या माजी विजेत्या संघाला द्यावे लागतील 4800 कोटी; जाणून घ्या कारण