नवी दिल्ली : इंग्लंडचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केविन पिटरसन याने सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा संकेत देताना आगामी पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) आपली अखेरची स्पर्धा असू शकेल, असे म्हटले. त्याचवेळी, पुढील १० वर्षांनंतर केवळ ५ देश कसोटी क्रिकेट खेळतील, असे भविष्यही त्याने ट्विटरवर वर्तविले.
पिटरसनने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले की, ‘पुढील दहा वर्षांनंतर आपल्याला केवळ इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, भारत, पाकिस्तान आणि आॅस्टेÑलिया हेच देश कसोटी क्रिकेट खेळताना दिसतील. उर्वरीत सर्व देश केवळ सफेद
चेंडूने खेळताना दिसतील. माझे हे ट्विट लक्षात ठेवा.’ त्याचवेळी, पिटरसनने न्यूझीलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज सारख्या अनुभवी संघांविषयी म्हटले की, ‘या संघांमध्ये खूप बदल पहायला मिळतील. आत्ताच्या तुलनेत या संघांमध्ये
खूप मोठा बदल घडेल.’ दखल घेण्याची बाब म्हणजे आयसीसी कसोटी क्रमवारीत न्यूझीलंड संघ इंग्लंडहून वरच्या स्थानी असूनही पिटरसनने न्यूझीलंडचा समावेश कसोटी खेळणाºया देशांमध्ये केलेला नाही.
युवांना मार्गदर्शन करणार...
१पिटरसनने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. पिटरसन आता पाकिस्तान सुपर लीगसाठी सज्ज असून त्याने याआधी बिग बॅश लीगमध्ये म्हटले होते की, ‘नक्कीच मैदानावर माझी खेळण्याची वेळ समाप्त होत आहे. यामुळे आता मी क्रिकेटच्या अंतिम क्षणांचा आनंद घेऊ इच्छितो. तरी माझ्यामध्ये क्रिकेट खेळण्याची खूप उर्जा शिल्लक आहे, पण ही उर्जा सातत्याने कमी होत आहे. २माझ्या स्पर्धात्मक क्रिकेटचा शेवट स्पष्टपणे दिसत आहे. पन असे असले तरी नुकताच झालेल्या बिग बॅश लीगमधील कामगिरीनुसार माझी कारकिर्द ठरु शकणार नाही. मी माझ्या कारकिर्दीत अनेक चह - उतार पाहिले असून आता मी युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करु इच्छितो. गेल्या तीन - चार वर्षांपासून मी हेच करण्याच्या प्रयत्नात आहे.’
गुरुवार २२ फेब्रुवारीपासून सुरु होणाºया पीएसएलसाठी पिटरसन सज्ज असून ही स्पर्धा त्याच्या कारकिर्दीतील अखेरची स्पर्धा ठरण्याची शक्यता आहे. त्याने दुबईला रवाना होण्याआधी आपल्या मुलासह एक छायाचित्रासह एक मेसेजही पोस्ट केला आहे. त्यात पिटरसनने म्हटले की, ‘क्रिकेटपटू या नात्याने मी जेसिका टेलर आणि माझ्या मुलाला अनेकदा गुडबाय म्हटले.
गुडबाय म्हणणे मला आवडत नाही, पण हे माझं काम आहे मला हे करावं लागेल. पुढील ३-४ आठवडे मी व्यावसायिक क्रिकेटपटू असेल आणि त्यानंतर हे सर्व संपेल.’
Web Title: Only five countries will play Test cricket in the next ten years
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.