Join us  

केवळ कोहलीच नाही, सर्वच फलंदाजांसाठी रणनीती : मार्श

भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यानच्या कसोटी मालिकेपूर्वी विराट कोहली चर्चेचा केंद्र असला तरी अष्टपैलू मिशेल मार्शच्या मते, आॅस्ट्रेलियन गोलंदाजांनी सर्वच भारतीय फलंदाजांसाठी रणनीती तयार केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 4:26 AM

Open in App

अ‍ॅडिलेड : भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यानच्या कसोटी मालिकेपूर्वी विराट कोहली चर्चेचा केंद्र असला तरी अष्टपैलू मिशेल मार्शच्या मते, आॅस्ट्रेलियन गोलंदाजांनी सर्वच भारतीय फलंदाजांसाठी रणनीती तयार केली आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. मार्शने सांगितले, की आमच्या गोलंदाजांनी रणनीती तयार केली असून, त्याची अंमलबजावणी करण्यावर लक्ष केंद्रित राहील.मार्श म्हणाला, ‘विराट महान खेळाडू असल्याची आम्हा सर्वांना कल्पना आहे. आम्ही त्याच्यासाठीही रणनीती तयार केली असून त्यात यशस्वी ठरू, अशी आशा आहे. पण, आम्ही उर्वरित फलंदाजांसाठी रणनीती आखली नाही, असा विचार जर कुणी करीत असेल तर ते मूर्खपणाचे आहे.’आॅस्ट्रेलियन फलंदाजी क्रमामध्ये अनुभव नसलेल्या नव्या चेहऱ्यांना बघून या मालिकेत जिंकण्याची संधी आहे, अशी चर्चा आहे. पण यजमान संघ कमकुवत नाही, असेही मार्शने स्पष्ट केले. मार्श म्हणाला, ‘यावर बरीच चर्चा होत आहे. पण आम्ही सांघिक कामगिरीच्या जोरावर आव्हानाला सामोरे जाऊ. आम्हाला कुठलेही दडपण जाणवत नाही.’आॅस्ट्रेलियाच्या उपकर्णधाराला भारतीय फिरकीच्याा आव्हानाबाबत छेडले असता तो म्हणाला,‘आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव चांगले फिरकीपटू आहेत, याची आम्हाला कल्पना आहे. पण भारतीय फिरकीपटू भारताप्रमाणे येथे यशस्वी ठरले नसल्याचा इतिहास आहे. पण ते जागतिक दर्जाचे गोलंदाज असून, आम्ही त्यांच्या आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज आहोत. ही मालिका रंगतदार होईल.’ (वृत्तसंस्था)