- सुनील गावसकर लिहितात...चेन्नई-दिल्ली संघांदरम्यानच्या क्वालिफायर-२ मध्ये अनुभवापुढे युवा खेळाडूंचा जोश अपयशी ठरला. चेन्नईच्या अनुभवी गोलंदाजांना भारतातील दिग्गज युवा फलंदाजांना रोखताना बघणे वेगळाच अनुभव देऊन गेला. त्यांच्या अचूक माºयापुढे युवा फलंदाजांकडे कुठले उत्तर नव्हते. दिल्लीचे उत्साहित फलंदाज स्ट्रोक खेळण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसले. त्यांनी पुढे सरसावत फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांना तंबूत परतावे लागले. कॅपिटल्स संघाचे फलंदाज नियमित अंतरात परतत असताना अनुभवी ईशांत शर्माचा जलवा अनुभवाला मिळाला. स्पेशालिस्ट गोलंदाजाची भूमिका बजावणाºया ईशांतने पुढे सरसावत दोन चेंडूंवर फटके खेळले त्यावेळी अनुभवाची महती पटली. दिल्ली संघाने १२ व्या पर्वात शानदार कामगिरी करीत छाप सोडली आणि भविष्यातील मोसमात हा संघ चषक उंचावण्यात यशस्वी ठरला तर आश्चर्य वाटणार नाही.अंतिम फेरी गाठणाºया दोन संघांवरुन एक बाब स्पष्ट झाली की, कोअर टीमवर विश्वास असेल तर अडचणीच्या स्थितीतूनही सावरता येते. उभय संघांत मॅच विनर खेळाडू असून संधी मिळाल्यानंतर ते सामन्याचे चित्र बदलण्यास सक्षम आहेत.कागदावर बघता मुंबईचे पारडे वरचढ भासत आहे. सध्याच्या मोसमात या संघाने चेन्नईचा तीन वेळा सहज पराभव केला आहे, पण अंतिम लढतीत निर्णायक क्षणी सर्वोत्तम कामगिरी करणारा संघ विजेता ठरतो. ही लढत आयपीएलमधील दोन दिग्गज संघांदरम्यान आहे. त्याच चेन्नईने १० पैकी ८ वेळा अंतिम फेरी गाठली आहे तर मुंबईला पाचवेळा फायलन खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे मोक्याच्या क्षणी मिळालेल्या संधीचा लाभ घेणार संघ या लढतीत विजेता ठरेल.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- मिळालेल्या संधींचा लाभ घेणाऱ्या संघालाच जेतेपद
मिळालेल्या संधींचा लाभ घेणाऱ्या संघालाच जेतेपद
चेन्नई-दिल्ली संघांदरम्यानच्या क्वालिफायर-२ मध्ये अनुभवापुढे युवा खेळाडूंचा जोश अपयशी ठरला. चेन्नईच्या अनुभवी गोलंदाजांना भारतातील दिग्गज युवा फलंदाजांना रोखताना बघणे वेगळाच अनुभव देऊन गेला.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 12:57 AM