Join us  

Court: मुलावर केवळ आईचाच हक्क असत नाही, शिखर धवनच्या पत्नीला हायकोर्टाने फटकारले, दिला मोठा निर्णय 

Shikhar Dhawan Family: पतियाळा हाऊस कोर्टाने भारतीय क्रिकेट संघातील डावखुरा सलामीवीर शिखर धवनपासून वेगळी राहत असलेली त्याची पत्नी आएशा धवन हिला मुलाला भेटू न देण्यावरून फटकारले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2023 5:33 PM

Open in App

पतियाळा हाऊस कोर्टाने भारतीय क्रिकेट संघातील डावखुरा सलामीवीर शिखर धवनपासून वेगळी राहत असलेली त्याची पत्नी आएशा धवन हिला मुलाला भेटू न देण्यावरून फटकारले आहे. आएशाने तिच्या ९ वर्षांच्या मुलाला कुटुंबीयांना भेटता यावे यासाठी भारतात घेऊन यावे, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. शिखर आणि आएशा हे काही काळापूर्वी विभक्त झाले आहेत. तसेच त्यांच्यात घटस्फोट आणि मुलांच्या कोठडीवरून कायदेशीर लढाई सुरू आहे. आएशा ही सध्या तिच्या मुलांसोबत ऑस्ट्रेलियामध्ये राहत आहे.

कोर्टाने मुलाला कुटुंबीयांना भेटू देण्याबाबत आएशाने घेतलेल्या आक्षेपावर नाराजीसुद्धा व्यक्त केली. कोर्टाने सांगितले की, ऑगस्ट २०२० नंतर शिखर धवनचं कुटुंब मुलाला भेटलेलं नाही. मुलावर केवळ आईचाच हक्क नसतो. शिखर धवन आतापर्यंत जर चांगला वडील म्हणून सिद्ध झालेला असेल तर आएशा मुलाच्या कुटुंबीयांसोबत होणाऱ्या भेटीबाबत आक्षेप का घेत आहे. तसेही शिखर धवनने मुलाची कायमस्वरूपी कस्टडी मागितलेली नाही. तो केवळ मुलाला भेटू इच्छित आहे. 

कोर्टाने आएशा धवनला आदेश दिले की, तिने धवनच्या कुटुंबीयांशी मुलाची भेट घडवून आणण्यासाठी मुलाला स्वत: भारतात घेऊन यावे किंवा कुठल्याही विश्वासू व्यक्तीसोबत त्याला भारतात पाठवावे. २८ जून रोजी १० वाजता मुलाचा ताबा धवनच्या कुटुंबाकडे सोपवण्यात यावा.

दरम्यान, आएशासाठी हे शक्य नसल्यास ती या आदेशानंतर ७२ तासांमध्ये आपली असमर्थता व्यक्त करू शकते. अशा परिस्थितीत शिखर धवन हा मुलाला ऑस्ट्रेलियातून भारतात घेऊन येईल. तसेच मुलाच्या भारतातील प्रवासासाठी व्हिसा आणि इतर आवश्यक परवानगी मिळवण्याची जबाबदारी आएशाची असेल. तसेच व्यवस्था अशी व्हावी की मुलगा २७ जूनला भारतात येईल आणि ४ जुलै रोजी परत ऑस्ट्रेलियात जाईल. तसेच या संपूर्ण प्रवासाचा खर्च शिखर धवन करेल.  

टॅग्स :शिखर धवनपरिवारन्यायालय
Open in App