कटक : शानदार फॉर्मात असलेल्या रोहित शर्मा २०१९ मध्ये आपल्या फलंदाजीला योग्य न्याय देवू शकला, पण इंग्लंडमध्ये झालेली विश्वचषक स्पर्धा जिंकता न आल्याचे खंत त्याला आहे. भारतीय उपकर्णधाराने यंदा विविध प्रकारामध्ये १० शतकांसह २,४४२ धावा करीत श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याचा विक्रम मोडला. रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत डावाची सुरुवात केली होती.
वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ‘मालिकावीर’ पुरस्काराचा मानकरी ठरल्यानंतर प्रतिक्रिया देताना रोहित म्हणाला, ‘यंदाचे वर्ष माझ्यासाठी चांगले राहिले. विश्वविजेतेपद पटकावले असते तर आणखी चांगले झाले असते, पण वर्षभर संघ म्हणून आम्ही प्रत्येक प्रकारत चांगली कामगिरी केली. मी माझ्या फलंदाजीचा पूर्ण आनंद घेत असून अशीच कामगिरी यापुढेही कायम राहील, अशी आशा आहे. आगामी वर्ष अधिक रोमांचक आहे.’
विश्वचषक स्पर्धेत पाच शतक आणि कसोटीत एक द्विशतकी खेळी करणारा रोहित म्हणाला, ‘मी आता माझ्या फलंदाजीला चांगल्या प्रकारे समजत आहे. मी माझ्या मर्यादा ओळखून खेळण्यास प्रयत्नशील आहो. रणनीतीनुसार खेळ करणे सर्वांत महत्त्वाचे आहे.’ भविष्यात आव्हाने असले तरी पण संघाला विजयाचा विश्वास आहे, असे सांगताना रोहित म्हणाला,‘कसोटी क्रिकेटमध्ये आव्हान असले तरी आम्ही विजय मिळवत तालिकेत अव्वल स्थानावर कायम राहण्यास प्रयत्नशील राहू.’ (वृत्तसंस्था)आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत कोहली अव्वल, रोहित दुसरादुबई : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध काल झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत दमदार कामगिरीच्या बळावर आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान मिळवले आहे. रोहितने कॅलेंडर वर्षांत सर्वाधिक धावा काढण्याचा सनथ जयसुर्याचा २२ वर्षे जुना विक्रम मोडित काढला. विराटने देखील २०१९ मध्ये सर्वाधिक धावा ठोकल्या.कोहलीने यंदा सर्व प्रकारात २४५५ धावा केल्या. रोहितने रविवारी विंडीजविरुद्ध ६३ धावा ठोकून वर्षभरात २४४२ धावा काढण्याची कामगिरी केली. जयसूर्याने १९९७ साली २३८७ धावा केल्या होत्या. रोहितने यंदा विश्वचषकात पाच शतके ठोकली होती. या दोघांशिवाय लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या क्रमवारीमध्ये सुधारणा झाली. मालिकेत १८५ धावा काढणाऱ्या राहुलने ७१ व्या स्थानी झेप घेतली, तर अय्यरने १३० धावा काढून १०४ व्या स्थानावरुन ८१ व्या स्थानी झेप घेतली.अव्वल दहा फलंदाजांमध्ये विंडीजचा शाय होप याचाही समावेश आहे. चेन्नईतील पहिल्या सामन्यात त्याने नाबाद १०२, तर मालिकेत २२२ धावा केल्या. तो आता नवव्या स्थानी आला. शिमरॉन हेटमायर १९ व्या, निकोलस पूरण ३० व्या स्थानी आला. गोलंदाजीत वेगवान गोलंदाज शेल्डन कॉटेÑल ३० व्या आणि कीमो पॉल १०४ व्या स्थानावर आला आहे.