ICC Rankings : Suryakumar Yadavला फटका, भारताचे केवळ दोन खेळाडू ICC क्रमवारीत टॉप टेनमध्ये

ICC Rankings : भारतीय संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला. पण, विराट कोहली व सूर्यकुमार यादव यांची कामगिरी दणदणीत राहिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 03:32 PM2022-11-16T15:32:30+5:302022-11-16T15:32:51+5:30

whatsapp join usJoin us
Only two Indian players in the top 10 (different categories) of the latest ICC men's T20Is Rankings; Suryakumar Yadav  retained his position at the top of the T20I Batting Rankings  | ICC Rankings : Suryakumar Yadavला फटका, भारताचे केवळ दोन खेळाडू ICC क्रमवारीत टॉप टेनमध्ये

ICC Rankings : Suryakumar Yadavला फटका, भारताचे केवळ दोन खेळाडू ICC क्रमवारीत टॉप टेनमध्ये

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC Rankings : भारतीय संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला. पण, विराट कोहली व सूर्यकुमार यादव यांची कामगिरी दणदणीत राहिली. आज आयसीसीने जाहीर केलेल्या ट्वेंटी-२० क्रमवारीत भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) याने फलंदाजांमध्ये आपली मक्तेदारी कायम राखताना अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली आहे. वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंडच्या खेळाडूंनी मात्र फलंदाजी, गोलंदाजी व अष्टपैलू या क्रमवारीत गगन भरारी घेतली आहे. सूर्याने दबदबा राखला असला तरी त्याच्यासह भारताचे दोनच खेळाडू टॉप टेन मध्ये दिसत आहेत.

T20 World Cup 2024च्या तयारीला लागा, आता सगळ्यांना समान संधी मिळणार; हार्दिक पांड्याची गर्जना, माजी कर्णधाराला सुनावले

सूर्यकुमारने सुपर १२मध्ये पाच सामन्यांत तीन अर्धशतकं झळकावली. त्याने कारकीर्दितील सर्वोत्तम ८६९ रेटींग पॉईंटसह अव्वल स्थान पटकावले होते, परंतु इंग्लंडविरुद्ध फायनलमध्ये तो १४ धावांवर बाद झाला. त्याचा त्याच्या  रेटींग पॉईंट्समध्ये १० गुणांचा फटका बसला. सूर्याने वर्ल्ड कपमध्ये ५९.७५च्या सरासरीने २३९ धावा केल्या आणि तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिला. इंग्लंडचा सलामीवीर ॲलेक्स हेल्स याने उपांत्य फेरीत भारताविरुद्ध ४७ चेंडूंत नाबाद ८६ धावा चोपल्या. त्याने आयसीसी क्रमवारीत २२ स्थानांची झेप घेत १२वा क्रमांक पटकावला. हेल्स या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा ( २१२ धावा) फलंदाज ठरला. हेल्सने २०२२मध्ये ट्वेंटी-२०त ४३० धावा केल्या आहेत.  

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम आणि रिली रोसोवू यांनीही त्यांच्या क्रमवारीत सुधारणा केली आहे. पाकिस्तानच्या कर्णधाराने उपांत्य फेरीत अर्धशतक झळकावले आणि तो पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. दक्षिण आफ्रिकेचा रोसोवू सातव्या क्रमांकावर आला आणि न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स आठव्या क्रमांकावर सरकला आहे. रोसोवूने बांगलादेशविरुद्ध शतकी खेळी केली. सुर्या व बाबर यांच्यासह मोहम्मद रिझवान, डेव्हॉन कॉनवे व एडन मार्कराम हे टॉप पाच फलंदाज आहेत. रिझवान व मार्कराम यांनी अनुक्रमे दुसरे व पाचवे स्थान टिकवले आहे. कॉनवे चौथ्या स्थानी सरकला आहे.  


गोलंदाजी विभागात इंग्लंडच्या आदिल रशीदने पाच क्रमांकाच्या सुधारणेसह तिसरे स्थान पटकावले आहे.  सॅम करनही पाचव्या क्रमांकावर आला आहे, तो ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. वनिंदू हसरंगा अव्वल स्थानावर  आहे. भारताचा एकही गोलंदाज टॉप टेनमध्ये नाही. भुवनेश्वर कुमार १४व्या क्रमांकावर आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये शकिब अल हसन, मोहम्मद नबी व हार्दिक पांड्या हे आघाडीच्या तीन क्रमांकावर आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"      

Web Title: Only two Indian players in the top 10 (different categories) of the latest ICC men's T20Is Rankings; Suryakumar Yadav  retained his position at the top of the T20I Batting Rankings 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.