कोलकाता : खेळाडूंच्या जीवनावर बरेच चित्रपट आलेत. रसिकांनी या चित्रपटांना डोक्यावरही घेतले. महेंद्रसिंह धोनी, सचिन तेंडुलकर या क्रिकेटपटूंच्या जीवनावर आधारित चित्रपटांनंतर आता भारताची माजी क्रिकेट कर्णधार झूलन गोस्वामी हिच्यावरील ‘बायोपिक’ची तयारीही जोरात सुरू आहे. झूलन ही भारतीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवणारी गोलंदाज आहे.
तिची कहाणी अनेक खेळाडूंना प्रेरणादायी ठरेल, असे निर्मात्यांना वाटते. झूलनचा संघर्ष जगासमोर यावा, तिचा जीवनपट उलगडावा, असा प्रामाणिक प्रयत्न दिग्दर्शक करणार आहेत. झूलनवरील आधारीत चित्रपटाचे नाव ‘चाकदह एक्स्प्रेस’ देण्यात आले आहे. या चित्रपटात तिच्या नगर नदिया या घरापासून ते २०१७ च्या विश्वचषकाच्या फायनलपर्यंतची कहाणी अधोरेखित करण्यात आली आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन सुशांत दास हे करीत आहेत. दास यांनी यापूर्वी एका बंगाली चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ते म्हणाले, या चित्रपटाची पटकथा लिहिण्यास लवकरच सुरुवात होईल. (वृत्तसंस्था)
अभिनेत्रीचा शोध...
झूलनच्या मुख्य भूमिकेसाठी उंच अभिनेत्रीचा शोध सुरू आहे. तिच्या भूमिकेसाठी बºयाच बॉलिवूड अभिनेत्रींच्या नावाची चर्चा आहे. परंतु, आम्ही याबाबत सध्या तरी सांगू शकत नाही. कारण करारावर स्वाक्षरी व्हायच्या आहेत.
झूलनच्या आयुष्यावरील हा चित्रपट देशातील मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल. आपण सचिन आणि धोनीच्या जीवनावरील चित्रपट पाहिले आहेत; परंतु महिला क्रिकेटपटूवरील हा पहिला चित्रपट असेल. आम्ही चित्रपटाचे शूटिंग झूलनच्या खासगी आयुष्यातील ठिकाणी करणार आहोत. ज्या ठिकाणी ती खेळली.. मोठी झाली.. ते ठिकाण चित्रपटातही पाहायला मिळणार आहे. तिचा संघर्षही या चित्रपटातून चाहत्यांना दिसेल.
Web Title: Opening the biopic, on the hanging screen, the preparations are going on
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.