ठळक मुद्देकुलदीप हा गेल्या काही दिवसांपासून चांगल्या फॉर्मात नव्हता, त्याचबरोबर आयपीएलमध्ये केकेआर त्याला संधीही देत नसल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे कुलदीपसाठी हा फारच कठीण काळ होता.
मुंबई - IPL मध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सच्या कुलदीप यादवला दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. आयपीएएलचे सामने रंगतदार होत असतानाच तो युएईमधून भारतात परतला. त्यानंतर, कुलदीपर वैद्यकीय शस्त्रक्रिया करण्यात आली असून आपली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे कुलदीपने म्हटले आहे. तसेच, मी लवकरच मैदानात परत येईन, असा विश्वासही कुलदीपने व्यक्त केला आहे.
कुलदीप यादवाल सराव करत असताना गंभीर दुखापत झाली होती. दुखापत गंभीर असल्यानेच त्याच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली. शस्त्रक्रीया करण्यासाठी कुलदीपला आयपीएल सोडवे लागले, तो मुंबईत दाखल झाला. आता कुलदीप मोठ्या कालावधीसाठी क्रिकेटमधून लांब राहणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, कुलदीपने ट्विटवरुन या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. माझ्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून मैदानात परतण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. आपण सर्वांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल आणि सहकार्याबद्दल आपले आभार. सध्या माझ्या प्रकृतीवर आणि लवकरात लवकर मैदानात परतण्यावरच माझा फोकस आहे, असे कुलदीपने ट्विटरवरुन म्हटले आहे. तसेच, त्याने रुग्णालयातील फोटोही शेअर केला आहे.
कुलदीप हा गेल्या काही दिवसांपासून चांगल्या फॉर्मात नव्हता, त्याचबरोबर आयपीएलमध्ये केकेआर त्याला संधीही देत नसल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे कुलदीपसाठी हा फारच कठीण काळ होता. त्यामध्येच कुलदीपला सराव करताना आता मोठी दुखापत झाली आणि तो आयपीएलपासून लांब गेला. मात्र, तो पुन्हा मैदानात येईल, असा विश्वास त्याने काही दिवसांतच बोलून दाखवला. त्यामुळे, त्याच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.
Web Title: Operation Success ... I will be back on the field soon, Kuldeep Yadav said thank you
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.