नवी दिल्ली: 'वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह नक्कीच भारतीय संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे; पण असे असले तरी त्याच्या पुनरागमनासाठी घाई करू नये. कारण, आगामी विश्वचषकासाठी त्याला खेळविण्याची घाई केली, तर तो शाहीन आफ्रिदीसारखा पुन्हा एकदा चार महिन्यांसाठी संघाबाहेर जाईल, असा मोलाचा सल्ला भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) राष्ट्रीय निवडकर्त्यांना दिला आहे.
बुमराह ऑगस्टमधील आयर्लंड दौऱ्यावर तो भारतीय संघात पुनरागमन करणार असल्याची माहिती मिळाली आहे; परंतु शास्त्री यांनी बुमराहबाबत कोणतीही घाई न करण्याचा सल्ला भारतीय संघ व्यवस्थापनाला आणि निवडकर्त्यांना दिला आहे. गेल्या सप्टेंबरपासून बुमराह कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही.
एका मीडिया हाऊसशी संवाद साधताना शास्त्री म्हणाले की, "आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने बुमराहला खेळविण्यास घाई केल्यास भारतीय संघाला हा निर्णय महागात पडू शकतो. पाकिस्तानने वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीसाठीही अशीच घाई केली आणि तो पुन्हा संघाबाहेर गेला. आता विश्वचषक स्पर्धा चार महिन्यांवर आहे. पुनरागमनानंतर पुन्हा दुखापतग्रस्त झाल्यास बुमराहच्या कारकीर्दीवर परिणाम होईल.'
बुमराहच्या दुखापतीचे टप्पे- जुलै २०२२ : इंग्लंडविरुद्ध दुसया एकदिवसीय सामन्यानंतर बुमराहने पाठदुखीची तक्रार केली आणि तिसरा सामना खेळला नाही.- ऑगस्ट २०२२ : दुखापतीमुळे बुमराह आशिया चषक स्पर्धेला मुकला.- सप्टेंबर २०२२ : अडीच महिन्यांच्या रिकव्हरीनंतर टी-२० विश्वचषकाआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बुमराहचे पुनरागमन.- ऑक्टोबर २०२२ : टी-२० विश्वचषक स्पर्धेतून बुमराह बाहेर.- जानेवारी २०२३ : श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी निवड; परंतु पुन्हा एनसीएमध्ये पाठदुखीची तक्रार दिल्यानंतर बुमराह संघाबाहेर,-फेब्रुवारी : २०२३ : बॉर्डर-गावसकर चषक कसोटी मालिकेतून बाहेर.-सप्टेंबर २०२२ : दोन टी-२० सामन्यांत ● मार्च २०२३ : आयपीएलमधून बाहेर. केवळ सहा षटके टाकल्यानंतर पाठदुखी पुन्हा उफाळली आणि बुमराह पूर्ण मालिकेतून बाहेर झाला.- न्यूझीलंडमध्ये पाठदुखीची शस्त्रक्रिया. • जून २०२३ : डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यातून बाहेर.
गोलंदाजीत भारत भक्कम' मायदेशात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत भारताची गोलंदाजी भक्कम असल्याचे मत शास्त्री यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्या अनुपस्थितीत भारताकडे वेगवान गोलंदाजीत मोठा अनुभव आहे. मायदेशात स्पर्धा होत असल्याने वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकी गोलंदाजांची भूमिका मोलाची ठरेल. यासाठी रवींद्र जडेजा, अक्षर पटेल यांच्यासह कुलदीप यादव, युझवेंद्र चहल आणि रवी बोश्नोई असे पर्याय भारताकडे आहेत. त्यामुळे गोलंदाजीत संघ भक्कम आहे, असे मला वाटते.'