IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सची घोडदौड काही चांगली सुरू नाही. सलग तीन पराभवांनंतर घरच्या मैदानावर सलग दोन विजय मिळवले खरे, परंतु काल त्यांची हार झाली. वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सने घरच्या संघावर २० धावांनी विजय मिळवला. त्यामुळे कर्णधार हार्दिक पांड्यावरील ( Hardik Pandya) चाहत्यांची चीड आणखी वाढली आहे. महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar ) आणि इंग्लंडचा माजी फलंदाज केव्हीन पीटरसन ( Kevin Pietersen ) यांनी MI कॅप्टन हार्दिकला फैलावर घेतले.
शतक पूर्ण झालं, तरी नो सेलिब्रेशन! Rohit Sharma चा हा Video सर्वांना करतोय इमोशनल
काल झालेल्या सामन्यात हार्दिकने २०वे षटक फेकले आणि महेंद्रसिंग धोनीने त्याच्या शेवटच्या ४ चेंडूंवर ३ षटकारांसह २० धावा चोपल्या. त्या षटकात एकूण २६ धावा चोपून चेन्नईने २०० पार धावसंख्या नेली. यानंतर गावस्कर आणि पीटरसन यांनी हार्दिकच्या कर्णधारपदावर आणि गोलंदाजीवर जोरदार टीका केली आहे. गावस्कर यांनी पांड्याची कॅप्टन्सी व गोलंदाजी अतिशय सामान्य असल्याचे वर्णन केले. पीटरसन म्हणाला की, प्रेक्षकांच्या गर्दीचा हार्दिक पांड्यावर नकारात्मक परिणाम होत आहे, जो तो लपवण्याचा प्रयत्न करत आहे.
''एक षटकार ठीक आहे. पुढच्या बॉलवर तुम्ही लेन्थ बॉल टाकला होता, हे माहीत असतानाही की फलंदाज अशा चेंडूंची वाट बघून फटके मारेल. तिसरा चेंडू तुम्ही फुल टॉस टाकत आहात. अतिशय सामान्य गोलंदाजी, अतिशय सामान्य कर्णधार. सीएसकेची धावसंख्या १८५-१९० पर्यंत रोखता आली असती, असा मला विश्वास होता,''असे गावस्कर म्हणाले.
सुनील गावस्कर आणि पीटरसन स्टार स्पोर्ट्सवर एक पॅनल म्हणून डावाचे विश्लेषण करत होते. त्यानंतर दोघांनीही हार्दिक पांड्यावर टीका केली. पीटरसन म्हणाला की, हार्दिक पांड्याला प्रेक्षकांच्या गर्दीचा फटका बसत आहे. आज संध्याकाळी मी जे पाहिले ते पुरेसे होते. पाच तास अगोदर झालेल्या टीम मीटिंगमधून प्लॅन ए असलेला कर्णधार मी पाहिला. मग गरज असतानाही कॅप्टनने प्लॅन बी स्वीकारला नाही. तुमचे वेगवान गोलंदाज २० धावा देत असताना फिरकीपटूला जबाबदारी का देऊ नये. नाणेफेक करताना तो खूप हसत होता. तो आनंदी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. तो आनंदी नाही.
Web Title: ordinary bowling, ordinary captaincy: Sunil Gavaskar & Kevin Pietersen slams Hardik Pandya, Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.