कोलकाता : नोव्हेंबर-डिसेंबर या कालावधीमध्ये भारतात होणाºया श्रीलंकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील एका सामन्याचे यजमानपद भूषविण्याची संधी नागपूरला मिळाली आहे. त्याचबरोबर या मालिकेतील अन्य दोन कसोटी सामने कोलकाता आणि नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येतील. तसेच, पुणे आणि मुंबई येथे एकदिवसीय व टी२० सामना खेळविण्यात येईल.भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) दौरा आणि कार्यक्रम समितीच्या कोलकाता येथे झालेल्या बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. गुवाहाटी येथील बारसापाडा येथे तयार झालेल्या नव्या स्टेडियमला आॅस्टेÑलियाविरुद्धच्या टी२० सामन्याचे आयोजन करण्याची संधी देण्यात आली आहे. भारतीय संघाचा यंदाही घरच्या मैदानावर मोठा मोसम असणार आहे. याचा मोसमाची सुरुवात सप्टेंबरच्या अखेरीस होणार असून डिसेंबरच्या अखेरीस हे सत्र समाप्त होईल. यादरम्यान भारतीय संघ एकूण २३ आंतरराष्ट्रीय सामने खेळेल.श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकाता, दुसरा सामना नागपूर आणि तिसरा सामना नवी दिल्ली येथे होईल. तिरुवनंतपुरम, इंदूर आणि मुंबई येथे श्रीलंकेविरुद्धचे तीन टी२० सामने खेळविले जातील. सप्टेंबरमध्ये आॅस्टेÑलियाविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेपासून या सत्राची सुरुवात होणार असून या मालिकेतील सामने चेन्नई, बंगळुरु, नागपूर, इंदूर आणि कोलकाता येथे खेळविण्यात येतील. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेला आॅक्टोबरमध्ये सुरुवात होईल. या मालिकेतील ३ एकदिवसीय सामने पुणे, मुंबई आणि कानपूर येथे होतील, तर तीन टी २० सामने नवी दिल्ली, कटक आणि राजकोट येथे पार पडतील. (वृत्तसंस्था)
क्रिकेट वेळापत्रकआॅस्ट्रेलियाविरुध्दची मालिका :पाच एकदिवसीय : चेन्नई, बंगळुरु, नागपूर, इंदूर आणि कोलकाता.तीन टी-२० : हैदराबाद, रांची, गुवाहाटी.न्यूझीलंडविरुध्दची मालिका :तीन एकदिवसीय - पुणे, मुंबई आणि कानपूर.तीन टी-२० : नवी दिल्ली, कटक आणि राजकोट.श्रीलंकेविरुद्धची मालिका :तीन कसोटी : कोलकाता, नागपूर आणि नवी दिल्ली.तीन एकदिवसीय : धर्मशाळा, मोहाली आणि विजाग.तीन टी-२० : तरुवनंतपुरम / कोच्ची, इंदूर आणि मुंबई.