भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) यानं रविवारी वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा ( Brian Lara) याच्यासोबत रस्ता सुरक्षा संदर्भात एक व्हिडीओ अपलोड केला. ४९ सेकंदाच्या या व्हिडीओत तेंडुलकर वाहतुक नियम समजावून सांगत आहे. टू व्हिलर चालवताना केवळ चालकच नव्हे, तर मागे बसणाऱ्या व्यक्तीनंही हेल्मेट घालणं महत्त्वाचं आहे, असे तेंडुलकर समजावतो आहे.
तेंडुलकरनं लिहिलं की,''क्रिकेटचं मैदान असो किंवा रस्त्यावर टू व्हिलर चालवणे असो, हेल्मेट घालणं महत्त्वाचं आहे. रस्त्यावरील सुरक्षिततेला हलक्यात घेऊ नका आणि हेल्मेट घालून नेहमी स्वतःला सुरक्षित ठेवा. या महत्त्वाचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला मदत करणाऱ्या ब्रायन लाराचे आभार.''
या व्हिडीओतील तेंडुलकर व लारा यांचा अभिनय पाहून युवराज सिंगनं ( Yuvraj Singh) कमेंट केली. त्यानं ऑक्सर नामांकन मिळालं पाहिजे, असे ट्विट केले.