थॉमसच्या गोलंदाजीने गतस्मृतींना उजाळा मिळाला

- सुनील गावसकर   पहिला टी-२० सामना कसोटी आणि वन-डे मालिकेपेक्षा काही वेगळा नव्हता. भारतीय संघ दडपणाखाली आला असताना विंडीजला ...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 05:30 AM2018-11-06T05:30:49+5:302018-11-06T05:31:06+5:30

whatsapp join usJoin us
oshane thomas news | थॉमसच्या गोलंदाजीने गतस्मृतींना उजाळा मिळाला

थॉमसच्या गोलंदाजीने गतस्मृतींना उजाळा मिळाला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- सुनील गावसकर  

पहिला टी-२० सामना कसोटी आणि वन-डे मालिकेपेक्षा काही वेगळा नव्हता. भारतीय संघ दडपणाखाली आला असताना विंडीजला वर्चस्व कायम राखण्यात अपयश आले. ओशाने थॉमसने विंडीजच्या समृद्ध वेगवान गोलंदाजींच्या स्मृतींना उजाळा दिला. त्याने वेगवान मारा करीत बाउन्सच्या जोरावर भारतीय फलंदाजांना अडचणीत आणले. विंडीजचा कर्णधार कालोस ब्रेथवेटने उंचीचा लाभ घेऊन भारतीय फलंदाजांना बॅकफूटवर खेळण्यास बाध्य केले. वेगवान व उसळणाऱ्या चेंडूंवर खेळताना भारतीय फलंदाजांना सहज वाटत नाही. उसळते चेंडू टाकण्यावर (प्रत्येक षटकात एक) मर्यादा आल्यानंतर आणि हेल्मेटचा वापर सुरू झाल्यानंतर जगातील अनेक फलंदाज बॅकफूटवर खेळण्याचे तंत्रच विसरले असल्याचे निदर्शनास येते. त्यात भारतीय फलंदाजांचाही समावेश आहे. दरम्यान, टी-२० क्रिकेटमध्ये एक गोलंदाज केवळ ४ षटके टाकू शकतो आणि विंडीज संघात थॉमसला सहकार्य करण्यासाठी त्या तोडीचा दुसरा गोलंदाज नव्हता. मधल्या फळीतील फलंदाजांनी भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. थॉमससारख्या गोलंदाजाची विंडीजला गरज आहे. शॅनोन गॅब्रियलच्या गोलंदाजीमध्येही वेग आहे; पण पहिल्या स्पेलमध्ये आखूड टप्प्याच्या चेंडूचा उपयोग करण्याबाबत त्याच्यात साशंकता असते. थॉमसने मात्र या अस्त्राचा चपखल वापर करून भारतीय फलंदाजांची परीक्षा घेतली. ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर चेंडूला उसळी मिळत होती; पण लखनौमध्ये अशीच मदत मिळण्याची शक्यता नाही, हे नमूद करावेसे वाटते. नव्या स्टेडियमबाबत भारतीय खेळाडूंनाही माहिती नाही. त्यामुळे दोन्ही कर्णधार नाणेफेक गमावून खेळपट्टीचे स्वरूप कसे राहते, हे बघण्यासाठी उत्सुक असतील.
दिनेश कार्तिकने पुन्हा एकदा आपला दर्जा सिद्ध केला. त्याने कृणाल पांड्याच्या साथीने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. कृणालने आपण या पातळीवर खेळण्यासाठी सज्ज असल्याचे सिद्ध केले. आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्ससाठी अशी भूमिका बजावलेली आहे. पदार्पण करणारा दुसरा खेळाडू खलील अहमद यानेही चांगला मारा केला.
पिरे आणि अ‍ॅलेन यांनीही चांगली कामगिरी केली. एकूण विचार करता, उभय संघांतर्फे पदार्पण करणाºया खेळाडूंसाठी ही लढत चांगली होती. मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी विश्वविजेत्या संघाला लखनौमध्ये विजय मिळवावा लागेल. त्यासाठी त्यांच्या फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करावी लागेल. (पीएमजी)

Web Title: oshane thomas news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.