नवी दिल्ली: 'रोहित शर्माने २०२७ सालच्या विश्वचषक स्पर्धेत खेळू नये. नाहीतर तो दक्षिण आफ्रिकेत बेशुद्धच होईल,' अशी तिखट प्रतिक्रिया भारताचे माजी क्रिकेटपटू कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी यूट्यूब चॅनलवर दिलेल्या एका मुलाखतीत दिली आहे.
श्रीकांत यांनी आपल्या यूट्युब चॅनलवर मुलगा अनिरुद्धसोबत बोलताना रोहितवर टीका केली. रोहित २०२७ साली दक्षिण आफ्रिकेत रंगणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत खेळू शकेल, असे तर्क लावण्यात येत आहेत. शिवाय, नवे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही तंदुरुस्ती टिकवल्यास रोहितसह विराट कोहलीही पुढील विश्वचषकात खेळताना दिसतील, असे म्हटले होते.
श्रीकांत म्हणाले की, 'विराट कोहली एक चॅम्पियन खेळाडू आहे. रोहित शर्माने २०२७ सालची विश्वचषक स्पर्धा खेळली नाही पाहिजे. तो दक्षिण आफ्रिकेत बेशुद्ध पडेल.'