आयपीएलमध्ये उलथापालथ घडवून आणण्याची क्षमता पुन्हा डोके वर काढू लागलीय. तीन शानदार विजयांनंतर आम्ही सलग दोन सामने गमावले. परंतु, सनरायझर्स हैदराबादच्या सेट-अपवरून चिंतीत होण्याचे काहीच कारण नाही, असे मला वाटते. अत्यंत जवळ आलेला सामना गमावल्यानंतर निराशा होतेच. परंतु, चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध संघाने ज्या पद्धतीने संघर्ष केला त्यावर मला अभिमान आहे. १८३ धावांचा पाठलाग करताना आम्ही पॉवरप्लेमध्ये ३ फलंदाज गमावले होते. पुनरागमन करीत आम्ही केवळ ४ धावांनी हा सामना गमावला. यातून आमच्या उत्कृष्ट नेतृत्वाचीही प्रचीती आली.केन विल्यम्सनची बुद्धिमत्ता आणि त्याची भूमिका नजरेसमोर होती आणि मला याची खात्री आहे की त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे इतरांवर चांगला परिणाम होईल. युसूफ पठाण हा ज्या खेळासाठी ओळखला जातो. तसाच खेळ त्याने केला. काही चेंडूंमध्ये खेळ बदलण्याची क्षमता असल्याचे त्याने दाखवून दिले.स्पर्धा जशी-जशी पुढे जाते त्यावेळी इतर फलंदाजांनी सुद्धा अधिक धावा कराव्यात अशा अपेक्षा असतात. आक्रमक सुरुवात करून देण्याची अपेक्षाही व्यवस्थापनची असते. स्पर्धा आता मध्यावर आली आहे. जो माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. जर आम्ही काही सामने जिंकले आणि पदकतालिकेत वरचे स्थान मिळवले तर आमच्यावरील पात्रतेचा दबाव कमी होईल. असे काही क्षेत्र आहे ज्यात आम्ही सुधारणा करू शकतो. मोहालीत आम्ही ख्रिस गेल आणि रविवारी अंबाती रायडू यांना आक्रमक खेळाची परवानगी दिली होती. फलंदाजांसाठी जे काही योग्य निर्णय घ्यायचे असतात ते आम्ही घेतो. गोलंदाजीत आमची गुणवत्ता आहेच. दोन षटके टाकल्यानंतर भुवी आपला स्पेल पूर्ण करू शकला नाही हे आमच्यासाठी दुर्भाग्यपूर्ण ठरले. त्याला त्रास होत होता. तो आमचा एक प्रमुख शस्त्र आहे, याबद्दल काहींनी शंकाही उपस्थित केली होती. काही जण माझ्यापर्यंत येऊन बोललेसुद्धा. मात्र, दुखापत हा खेळाचा एक भाग आहे. मला त्याबद्दल काही समस्या नाही. आता आमचा पुढील सामना बुधवारी मुंबई इडियन्सविरुद्ध होणार आहे. आमचा प्लॅन अगदी सोपा आहे. तो म्हणजे क्षमतेनुसार प्रदर्शन करा आणि विजयपथावर या.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- क्षमतेनुसार प्रदर्शनावर आमचा भर
क्षमतेनुसार प्रदर्शनावर आमचा भर
स्पर्धा आता मध्यावर आली आहे. जो माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:05 AM