भारतीय संघाबाहेर गेला, पण आता मुंबईकडून खेळताना पृथ्वी शॉने रेकॉर्डब्रेक डबल धमाका केला

VijayHazareTrophy2021, Mumbai's caption Prithvi Shaw hit a record-breaking double century : भारतीय संघातील स्थान गमावल्यानंतर आता विजय हजारे करंडक स्पर्धेत मुंबईकडून खेळताना पृथ्वी शॉने जबरदस्त फलंदाजी करत विक्रमी कामगिरी केली आहे

By बाळकृष्ण परब | Published: February 25, 2021 01:00 PM2021-02-25T13:00:46+5:302021-02-25T13:16:03+5:30

whatsapp join usJoin us
Out from Indian Cricket team but now playing for Mumbai, Prithvi Shaw hit a record-breaking double century | भारतीय संघाबाहेर गेला, पण आता मुंबईकडून खेळताना पृथ्वी शॉने रेकॉर्डब्रेक डबल धमाका केला

भारतीय संघाबाहेर गेला, पण आता मुंबईकडून खेळताना पृथ्वी शॉने रेकॉर्डब्रेक डबल धमाका केला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देमुंबईचे नेतृत्व करणाऱ्या पृथ्वीने पाँडेचेरीविरुद्धच्या लढतीत तुफानी द्विशतकी खेळी करताना १५२ चेंडूत नाबाद २२७  धावा फटकावल्यापृथ्वी शॉने १५२ चेंडूत केलेली नाबाद २२७ धावांची खेळी ही लिस्ट ए क्रिकेटमध्ये कुठल्याही कर्णधाराने केलेली सर्वात मोठी खेळी ठरलीया खेळीच्या जोरावर मुंबईने निर्धारीत ५० षटकांत ४ बाद ४५६ धावा फटकावल्या

मुंबई - ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सुमार कामगिरीमुळे युवा मुंबईतर फलंदाज पृथ्वी शॉ याला भारतीय संघातून (Indian Cricket Team)डच्चू देण्यात आला होता. मात्र भारतीय संघातील स्थान गमावल्यानंतर आता विजय हजारे करंडक (VijayHazareTrophy2021)  स्पर्धेत मुंबईकडून खेळताना पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) जबरदस्त फलंदाजी करत विक्रमी कामगिरी केली आहे. मुंबईचे नेतृत्व करणाऱ्या पृथ्वीने पाँडेचेरीविरुद्धच्या लढतीत तुफानी द्विशतकी खेळी करताना १५२ चेंडूत नाबाद २२७  धावा फटकावल्या. (Out from Indian Cricket team but now playing for Mumbai, Prithvi Shaw hit a record-breaking double century )

पृथ्वी शॉने १५२ चेंडूत केलेली नाबाद २२७ धावांची खेळी ही लिस्ट ए क्रिकेटमध्ये कुठल्याही कर्णधाराने केलेली सर्वात मोठी खेळी ठरली आहे.  ही खेळी करताना त्याने दक्षिण आफ्रिकेचे ग्रीम पोलॉक ( नाबाद २२२), भारताचा वीरेंद्र सेहवाग (२१९) आणि रोहित शर्मा (२०८) यांनी कर्णधार म्हणून केलेल्या मोठ्या खेळीचा विक्रम मोडीत काढला आहे. 

विजय हजार करंडक स्पर्धेत आज मुंबई आणि पाँडेचेरी यांच्यात झालेल्या लढतीमध्ये पाँडेचेरीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर मुंबईकडून सलामीला उतरलेल्या पृथ्वी शॉ याने तुफानी फलंदाजीचे प्रदर्शन केले. यशस्वी जयस्वालच्या (१० धावा) रूपात मुंबईला सातव्या षटकात मोठा धक्का बसला. त्यानंतर पृथ्वीने आदित्य तारेसोबत (५६ धावा) मिळून १५३ धावांची भागीदारी केली. तारे ५६ धावांवर बाद झाला.

तारे बाद झाल्यानंतर पृथ्वीने सूर्यकुमार यादवसोबत पाँडेचेरीच्या गोलंदाजांची धुलाई सुरू ठेवली. यादरम्यान, सूर्यकुमारने आपले शतक तर पृथ्वीने आपले द्विशतक पूर्ण केले. सूर्यकुमार ५८ चेंडूत १३३ धावा तडकावून बाद झाला. मात्र तत्पूर्वी सूर्यकुमार आणि पृथ्वीने २०१ धावांची भागीदारी करत मुंबईला चारशे धावांचा टप्पा ओलांडून दिला.

दरम्यान, सलामीला आलेल्या पृथ्वी शॉने अखेरच्या षटकापर्यंत खेळपट्टीवर तळ ठोकत  १५२ चेंडूत नाबाद २२७ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर मुंबईने निर्धारीत ५० षटकांत ४ बाद ४५७ धावा फटकावल्या. 

 

Web Title: Out from Indian Cricket team but now playing for Mumbai, Prithvi Shaw hit a record-breaking double century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.