- अयाझ मेमनभारत आणि इंग्लंड यांनी अलीकडे कसोटी मालिकेत निर्भेळ यश संपादन केल्यानंतर आता दोन्ही संघ रोमहर्षक लढतींसाठी परस्परांपुढे येणार आहेत. कोरोनाच्या संकटात क्रिकेटच्या माध्यमातून आयुष्यात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळू शकतात. भारताने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात लोळवले. त्या कामगिरीची पुनरावृत्ती आगामी मालिकेतही झाल्यास पाहुण्या संघावर विजय मिळविणे फार कठीण जाणार नाही.ते? दोन संघ कसे आहेत? भारताला मायदेशात खेळण्याचा मोठा लाभ आहेच. मागच्या वेळी इंग्लंड संघ येथे आला तेव्हा विराट कोहली ॲन्ड कंपनीने त्यांना ४-ढने नमवले होते. यंदा याची पुनरावृत्ती होईलच असे नाही. अलीकडील इंग्लंडची कामगिरी बघता त्यांना पराभूत करणे सोपे जाणार नाही.काय अडथळे असतील, नेमके धोके कोणते? भारताने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक मालिका विजयाची नोंद केली तर इंग्लंडने लंकेला २-० ने क्लीन स्वीप दिला. मागच्या दहा वर्षांत पाहिलेला सध्याचा श्रीलंका संघ दिसत नाही. तरीही घरच्या मैदानावर लंकेला पराभूत करण्याचे आव्हान होतेच. तरीही इंग्लंडने सांघिक बळावर त्यांना चारीमुंड्या चीत केले. वेगवान आणि फिरकी गोलंदाजांनी सारखे योगदान देत गडी बाद केले. फलंदाजही मागे नव्हते. ज्यो रुट धडाकेबाज फॉर्ममध्ये आहे. बेयरेस्टो, बटलर, लॉरेन्स यांची त्याला भक्कम साथ लाभली.श्रीलंकेवर विजय मिळविणे इंग्लंडचे मुख्य लक्ष्य होते असे मानले तरी संघाच्या दृष्टीने भारताविरुद्ध तयारी करणे महत्त्वपूर्ण होते. आशिया खंडात भारताविरुद्ध येणाऱ्या संभाव्य अडथळ्यांवर मात करण्याचे तंत्र लंकेविरुद्ध दोन सामने खेळताना शिकून घ्यायचे होते.२०१६ला भारताने इंग्लंडला ४-०ने हरविले खरे, मात्र त्यानंतर धोनीच्या सक्षम नेतृत्वात भारत इंग्लंडकडून १-२ने पराभूत झाला हे सत्य नाकारता येणार नाही. ॲलिस्टर कूक आणि केविन पीटरसन, पानेसर, स्वान, ॲन्डरसन यांनी फलंदाजी तसेच गोलंदाजीत दमदार कामगिरी करीत भारतीय परिस्थितीत मालिका विजयाची नोंद केली होती. युवा आणि अनुभवाचे संयोजन साधून भारतीय संघाला त्यांनी जमिनीवर आणले होते.कोहली आणि शास्त्री यांनी आपल्या खेळाडूंना हे सत्य समजावून सांगायला हवे. आगामी मालिका जिंकल्यात जमा असल्याचे मानू नये. अतिआत्मविश्वास हा नेहमी धोकादायक ठरू शकतो. आगामी मालिकेत काय घडेल हे सांगता येत नसले तरी घरच्या मैदानावर गाफील राहणे भारतीय संघाच्या मुळावर उठण्याची शक्यता नाकारता येत नाही. ॲन्डरसन, ब्रॉड, आर्चर आणि स्ट्रोक्स विरुद्ध कोहली, रोहित, पुजारा आणि रहाणे अशी ही लढाई असेल.
रवीचंद्रन अश्विनविरुद्ध ज्यो रुट आणि स्टोक्स हे द्वंद्वदेखील रंगणार आहेच. अश्विनने ऑस्ट्रेलियात स्टीव्ह स्मिथ याच्यासह अनेक फलंदाजांवर वर्चस्व गाजवले होते. आगामी मालिकेत त्याचे टार्गेट ९९ कसोटींचा अनुभव असलेला ज्यो रुट असेल. इंग्लंडचा उत्कृष्ट आणि सध्याच्या पिढीतील लोकप्रिय फलंदाज आहे. लंकेविरुद्ध त्याने दोन कसोटीत तब्बल ४२६ धावा ठोकल्या. अश्विनने २०१६च्या दौऱ्यात २८ गडी बाद केले, पण रुटला केवळ दोनदा टिपले होते. स्टोक्सविरुद्धदेखील तो प्रभावी ठरला आहे. २०१६ आणि १८च्या मालिकांमध्ये अश्विनने १५ढ धावा देत स्टोक्सला सात वेळा बाद केले. भारतात त्याची कामगिरी अधिक प्रभावी झालेली दिसते. येथे अश्विनने त्याला १०१ धावांच्या मोबदल्यात पाच वेळा बाद केले आहे. २०१८ पासून स्टोक्सने ५३ डावांमध्ये चार शतकांसह तब्बल १९९९ धावा कुटल्या. जगातला सर्वोत्तम अष्टपैलू असलेला हा खेळाडू मॅचविनरदेखील आहे. अश्विन रुट आणि स्टोक्स यांच्याविरुद्ध कसा प्रभावी ठरेल, हे मालिकेत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.